TRAI चा नवा आदेश लागू झाला तर, १००-१५० TV Channels होणार बंद!

TRAI चा नवा आदेश लागू झाला तर, १००-१५० TV Channels होणार बंद!

TRAI चा नवा आदेश लागू झाला तर, १००-१५० TV Channels होणार बंद!

ट्रायच्या नवीन दर आदेशामुळे (Tariff Order) टीव्ही ब्रॉडकास्टर कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कंपन्यांचे मते, सुधारित दर म्हणजेच एनटीओ २.० लागू केल्यास देशातील १०० ते १५० वाहिन्या बंद होऊ शकतात. कमाईसाठी धडपडणार्‍या चॅनेलकरता हे मोठं संकट तर ठरेल पण पुढील एक-दोन वर्षात ते पूर्णपणे बंद होणार आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, स्टार आणि डिस्ने इंडियाचे चेअरमन आणि वॉल्ट डिस्नेचे एशिया पॅसिफिकचे अध्यक्ष उदय शंकर आणि झी एंटरटेनमेंटचे एमडी-सीईओ पुनीत गोयंका म्हणाले की, एनटीओ २.० चॅनेलसाठी घातक असणार आहे. मात्र या नव्या आदेशाची अंमलबजावणी केल्यास पुढील काही वर्षांत १०० ते १५० वाहिन्या बंद होऊ शकतात.

नवीन दर आदेश यंदा १ जानेवारी रोजी अधिसूचित करण्यात आला होता. परंतु देशातील टॉप टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स, इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशन आणि फिल्म अँड टीव्ही प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडिया यांनी त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, ब्रॉडकास्टर्सना कोणताही दिलासा न देता कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.

२४ जुलै रोजी ट्रायने ब्रॉडकास्टर्सना एनटीओ २.० च्या तरतुदीनुसार संदर्भ इंटरकनेक्ट ऑफरमध्ये फेरबदल करण्यास व त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्यास सांगितले आहे. दरम्यान, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी इंडिया ब्रॉडकास्टर फाउंडेशनला आश्वासन दिले की एनटीओ २.० अद्याप लागू करण्यात येणार नाही.

एनटीओ २.० अंतर्गत ट्रायने चॅनेलसाठी मासिक शुल्क १२ रुपये निश्चित केले आहे. चॅनेलच्या ग्रृपमध्ये देण्यात येणारी सवलतदेखील ३३ टक्क्यांपर्यंत मर्यादित केली आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याशिवाय वाहिन्यांना जाहिराती मिळू शकत नाहीत, असं उदय शंकर म्हणतात.

म्हणून, चॅनेलला स्पर्धेत टिकून राहणे कठीण होईल. याचा परिणाम केवळ इंग्रजी वाहिन्यांवरच होणार नाही तर क्षेत्रीय वाहिन्यांच्या उत्पनावरही होईल. त्यामुळे स्टार इंडियाला आपले इंग्लिश एंटरटेन्मेंट चॅनल स्टार वर्ल्ड बंद करावे लागणार आहे.


भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राईक, पुन्हा एकदा ४७ चीनी Apps वर बंदी!

First Published on: July 27, 2020 1:53 PM
Exit mobile version