Budget 2022 : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार, अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता

Budget 2022 : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार, अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (मंगळवार) १ फेब्रुवारी रोजी देशाचं अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना काळात फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं आव्हान सीतारामन यांच्यासमोर आहे. चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर होणार असून आव्हानांचा डोंगर सीतारामन यांच्यासमोर आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे.

२०२२ च्या अर्थसंकल्पात फिटमेन्ट फॅक्टरवर निर्णय होण्याची शक्यता आहे. कॅबिनेटमधून मंजूरी मिळाल्यानंतर अर्थसंकल्पाचा खर्चामध्ये त्याचा सहभाग घेतला जाणार आहे. केंद्र सरकार फिटमेन्ट फॅक्टरला वाढवते. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आपोआप वाढ होणार आहे.

वेतनात होणार इतकी वाढ

फिटमेन्ट फॅक्टरला २०१६ मध्ये वाढवण्यात आलं होतं. ज्यामध्ये कर्चमाऱ्यांचा मूळ वेतन ६ हजार रूपयांनी वाढून १८ हजार रूपये इतके करण्यात आले होते. फिटमेन्ट फॅक्टर मध्ये मूळ वेतन २६ हजार रूपये इतकं असू शकतं.

भत्त्यामध्ये होणार वाढ

मूळ वेतन १८ हजार रूपयांनी वाढून २६ हजार रूपये होऊ शकतो. महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. महागाई भत्ता (Dearness Allowance-DA) मूळ वेतनासाठी ३१ टक्क्यांच्या बरोबरीने आहे.


हेही वाचा : Budget 2022: स्वस्त आणि महागाईवर असणार सर्वसामान्यांची नजर; यंदाच्या बजेटचा खिशावर किती होणार परिणाम?


 

First Published on: February 1, 2022 11:07 AM
Exit mobile version