घरअर्थसंकल्प २०२२Budget 2022: स्वस्त आणि महागाईवर असणार सर्वसामान्यांची नजर; यंदाच्या बजेटचा खिशावर किती...

Budget 2022: स्वस्त आणि महागाईवर असणार सर्वसामान्यांची नजर; यंदाच्या बजेटचा खिशावर किती होणार परिणाम?

Subscribe

यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2022) कोणत्या गोष्टी स्वस्त होऊ शकतील आणि कोणत्या गोष्टींचे भाव वाढतील हे जाणून घ्या.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्प सादर होताच सर्वसामान्यांसाठी काही गोष्टी महाग होतील आणि काही गोष्टी स्वस्त होतील. उत्तर प्रदेशसह ५ राज्यांमधील निवडणुका (5 state elections 2022) लक्षात ठेवून यंदा मोदी सरकारने (Modi government) लोकांना अधिकाधिक दिलासा देण्याचा प्रयत्न करेल. यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2022) कोणत्या गोष्टी स्वस्त होऊ शकतील आणि कोणत्या गोष्टींचे भाव वाढतील हे जाणून घेऊया.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलबाबतची घोषणा नक्की होईल. सरकार उत्पादन शुल्क काहीप्रमाणात कपात करू सर्वसामान्यांना दिलासा देऊ शकते, परंतु नवीन उपकर लागू करून इतर मार्गाने किमत वाढवण्याची शक्यता आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून विमा कंपन्या आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्यात यावा अशी मागणी करत आहेत. बरेच लोक जास्त प्रीमियममुळे आरोग्य विमा घेत नसल्याचे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत जर लावणारा जीएसटी १८ टक्क्यांनी घटवून ५ टक्के केला तर जास्तीत जास्त लोकं आरोग्य विमा घेतील.

- Advertisement -

तसेच यंदा महागड्या एलपीजी गॅस सिलिंडरपासून दिलासा देण्यासाठी सरकार काय पाऊले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण सरकारने लोकांना मोफत उज्ज्वला सिलिंडरचे वाटप केले, पण आता गॅस रिफिल करण्यासाठी १००० रुपये खर्च करण्याऐवजी गरीब लोकांना लाकडे जाळून चुलीवर अन्न शिजवावे लागत आहे.

गेल्या वर्षी अर्थसंकल्पात स्वस्त आणि महाग काय झाले?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्यक्ष करदात्यांना केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ मध्ये कोणताहा दिलासा दिला नव्हता. सरकारने दारू, चणे, वाटाणे, मसून यासह अनेक उत्पादनांवर कृषी पायाभूत सुविधा उपकर लागू करण्याची घोषणा केली होती. निर्मला सीतारामन यांनी कस्टममध्ये ४००हून जास्त सवलतींचे पुनरावलोकन करण्याचा प्रस्ताव दिला होता. तसेच अनेक प्रकारच्या कच्च्या मालावर कस्टम ड्युटी वाढवली आणि काही स्टील उत्पादनांवरील शुल्क हटवण्यात आले. याशिवाय तांब्याच्या भंगारावरील शुल्क ५ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांपर्यंत कमी केले. मोबाईलच्या काही पार्ट्सवर २.५ टक्के शुल्क लावण्यात आले. कापूस, रेशीम, प्लास्टिक, चामडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहनांचे भाग, सौर उत्पादने, मोबाईल, चार्जर, आयात केलेले कपडे, रत्न, एलईडी बल्ब, फ्रीज/एसी आणि मद्य बजेटमध्ये महागले आहेत. दुसऱ्याबाजूला नायलॉनचे कपडे, लोखंड, स्टील, तांब्याच्या वस्तू, सोने, चांदी आणि प्लॅटिनम या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Union Budget 2022 : यंदाही बजेट असणार पेपरलेस; जाणून घ्या अर्थमंत्र्यांच्या भाषणाला केव्हा होणार सुरुवात?


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -