Budget Session of Parliament: यंदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट; पावसाळी अधिवेशन २०२० प्रमाणे निर्बंध लागू होण्याची शक्यता!

Budget Session of Parliament: यंदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट; पावसाळी अधिवेशन २०२० प्रमाणे निर्बंध लागू होण्याची शक्यता!

संसदेचे ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान होणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी संसदेचे ७०० हून अधिक कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. माहितीनुसार ४ जानेवारीपर्यंत संसद परिसरातील ७१८ कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ज्यामध्ये २०४ कर्मचारी एकट्या राज्यसभा सचिवालयातील होते. यादरम्यान तज्ज्ञांनी म्हटले आहे की, जेव्हापासून संसद सुरू होईल, तेव्हा कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचली असेल. अशात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असेल.

देशात कोरोनासह ओमिक्रॉनच्या वाढत्या संकटादरम्यान होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची परिस्थिती पावसाळी अधिवेशन २०२० प्रमाणे होऊ शकते. सप्टेंबर २०२०मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशनात कठोर कोरोना नियम लागू केले होते. दिवसाच्या पहिल्या भागात राज्यसभा बैठक आणि दुसऱ्या भागात लोकसभा बैठक आयोजित केली जात होती. त्यानुसार पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन पूर्वनियोजित वेळेनुसार पार पडले. पण याकाळात सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम पाळण्यात आले. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कठोर कोरोना नियम पुन्हा लागू होऊ शकतात.

दोन टप्प्यात पार पडणार यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात १ फेब्रुवारीला केंद्र सरकार संसदेत बजेट सादर करणार आहे. दोन टप्प्यात सभागृहाचे कामकाज होणार आहे. ११ फेब्रुवारीला अधिवेशनाचा पहिला टप्पा होणार आहे. तर दुसरा टप्पा १२ मार्चपासून सुरू होणार आहे. संसदेचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ८ एप्रिलपर्यंत चालणार असून काही दिवस विश्रांतीसुद्धा देण्यात आली आहे.


हेही वाचा – UP Elections 2022 : सपाचं सरकार स्थापन होणं म्हणजे दंगलखोरांचं राज्य येणं, केशव प्रसाद मौर्यांचा हल्लाबोल


First Published on: January 15, 2022 11:00 AM
Exit mobile version