घरदेश-विदेशUP Elections 2022 : सपाचं सरकार स्थापन होणं म्हणजे दंगलखोरांचं राज्य येणं,...

UP Elections 2022 : सपाचं सरकार स्थापन होणं म्हणजे दंगलखोरांचं राज्य येणं, केशव प्रसाद मौर्यांचा हल्लाबोल

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकींचे बिगुल वाजले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या उमदेवारांची नावे आणि यादी जाहीर केल्या आहेत. परंतु उमेदवारी देण्याबाबत आता आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत १२५ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर समाजवादी आणि राष्ट्रीय लोक दल पक्षाकडून २९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांनी किंवा आमदारांनी पक्षप्रवेश जरी केला असला तरी त्यांच्याकडून आता सपावर टीकेची झड उडवताना दिसत आहेत.

युपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाकडून युपी निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमदेवारांबाबत म्हणाले की, समाजवादी पार्टीने ज्या यादीची घोषणा केलीय. त्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. २०१७ मध्ये पहिल्यांदा ज्याप्रमाणे पश्चिम भागातील उत्तर प्रदेशची ज्या प्रकारे स्थिती होती त्याचासंबंधित ट्रेलर दाखवण्याचं काम आम्ही केलंय. आम्ही दंगलखोरांची साथ आणि ओरोपींचा साथ कधीच सोडू शकत नाही, असा प्रकारचा संदेश अखिलेश यादव यांनी दिलाय, असं केशव प्रसाद म्हणाले.

- Advertisement -

पुढे म्हणाले की, समाजवादी पार्टीची राज्यात स्थापना होणार म्हणजे दंगलखोरांचं राज्य पुन्हा एकदा येणार, अशा प्रकारची टीका केशव प्रसाद यांनी अखिलेश यादव यांच्यावर केली आहे.


हेही वाचा : Bulli Bai app case: बुल्लीबाई अ‍ॅपप्रकरणी श्वेता सिंगला न्यायालयीन कोठडी ; तिघांच्या जामिन अर्जावर सोमवारी सुनावणी

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -