बुराडी आत्महत्या प्रकरण : नारायणी देवींच्या मृत्यूचे गूढ उलगडले

बुराडी आत्महत्या प्रकरण : नारायणी देवींच्या मृत्यूचे गूढ उलगडले

भाटिया कुटुंबाचा फोटो

अखेर बुराडी आत्महत्येप्रकरणी नारायणी देवींचा पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना देण्यात आला आहे. गुरुवारपर्यंत नारायणी देवी यांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांमध्ये एकमत होत नव्हते. त्यांचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला होता, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यांच्या मानेवर काही खूणा होत्या. त्यामुळे त्यांना आधी मारले असावे, असे डॉक्टरांना वाटत होते.  अखेर विचारविनिमय करुन डॉक्टरांनी पोस्टमार्टम रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टनुसार नारायणी देवी यांनीही आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय आहे पोस्टमार्टम रिपोर्ट

मंगळवारी बुराडी येथील भाटिया कुटुंबाच्या घरी जाऊन पुन्हा एकदा परीक्षण करण्यात आले. नातेवाईकांनी हत्येचा संशय व्यक्त केल्यामुळे पोस्टमार्टम रिपोर्ट काय असणार याकडे नातेवाईकांचे लक्ष होते. १० जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले होती. त्यांचा मृत्यू गळफास लावून झाल्याचे पोस्ट मार्टम रिपोर्टमधून समोर आले होते. पण या कुटुंबातील आजी नारायणी देवी यांचा मृतदेह दुसऱ्या खोलीत सापडला होता. त्यांच्या गळ्याला देखील इतरांसारखा फास होता. पण त्यांना आधी मारल्याचा संशय होता. पण आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सगळ्यात शेवटी नारायणी देवींनी आत्महत्या केली असे देखील या रिपोर्टमध्ये कळत आहे.

वाचा- बुराडी आत्महत्या प्रकरण: आजीच्या मृत्यूचे गूढ कायम

अन्य कोणाचेही फिंगर प्रिंट नाही

घरात ११ जणांना सोडून कोणाचेही फिंगर प्रिंट सापडले नाही. त्यामुळे घरात या ११ लोकांना सोडून बाहेरचे कोणीही आले नाही. कारण ज्या रात्री त्यांनी पूजा विधी केला (डायरीनुसार) त्या रात्री मागवलेल्या चपात्या देण्यासाठी आलेल्या मुलाकडून प्रियांकाने बाहेर येऊन चपात्या घेतल्या. त्यामुळे कुटुंबातील सोडून कोणाचेही फिंगर प्रिंट घरात सापडले नाही. त्यामुळे ही हत्या नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

वाचा-बुराडी आत्महत्या प्रकरणाचा खरचं उलगडा झाला का ?

या आधीही असेच काहीसे घडले

शंकराचे दर्शन घेण्यासाठी राजस्थानमधील एका कुटुंबाने लाडूमधून साईनाईट खाल्ले होते. यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. पण त्यांनी हे कृत्य शंकराला भेटण्यासाठी केले असल्याचे उघड झाले होते. कारण पुराव्या दाखल पोलिसांना त्यांनीच रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मिळाला होता.

First Published on: July 13, 2018 3:59 PM
Exit mobile version