घरदेश-विदेशबुराडी आत्महत्या प्रकरण: आजीच्या मृत्यूचे गूढ कायम

बुराडी आत्महत्या प्रकरण: आजीच्या मृत्यूचे गूढ कायम

Subscribe

घरातील आजी नारायणी देवींचा मृतदेह दुसऱ्या खोलीत होता. त्यांच्या गळ्याला कापड बांधलेले होते. पण त्यांचा मृत्यू इतरांसारखा छताला गळफास लावून झाला नसावा, असे पोलिसांनी सांगितले होते. कारण नारायणी देवी यांचे वय पाहता त्या स्टुलावर उभे राहू शकत नव्हत्या.

दिल्लीतील बुराडीतल्या भाटिया आत्महत्या प्रकरणात रोज काही ना काही तरी नवे समोर येत आहे. बुधवारी घरातील १० जणांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आले आणि यात गळफास लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तर घरातील आजी नारायणी देवी यांचा मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळला होता. नेमका त्यांचा मृत्यू कसा झाला या संदर्भात अद्यापही डॉक्टरांचे एकमत होऊ शकले नाही. गुरुवारी नारायणी देवींचा पोस्टमार्टम रिपोर्ट येणार आहे त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचा उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पोलिसांना नारायणी देवी यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत.

नारायणी देवींनी फास लावणे अशक्य

१ जुलैला दिल्लीतल्या बुराडीनगर भागात संतनगरमध्ये भाटिया कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी सापडले होते. १० जणांचे मृतदेह गळफास लावलेले होते. तर घरातील आजी नारायणी देवींचा मृतदेह दुसऱ्या खोलीत होता. त्यांच्या गळ्याला कापड बांधलेले होते. पण त्यांचा मृत्यू इतरांसारखा छताला गळफास लावून झाला नसावा, असे पोलिसांनी सांगितले होते. कारण नारायणी देवी यांचे वय पाहता त्या स्टुलावर उभे राहू शकत नव्हत्या. गळ्यात कपड्याचा फास घालून तो कपडा ओढून त्यांचा गळा आवळण्यात आल्याचे तपासादरम्यान समोर आलेआहे. नारायणी देवींना आधी फास लावून तो ललित, टीना किंवा भावेश यांनी आवळला असावा असा अंदाज आहे, दरम्यान आता त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर आता सगळा खुलासा होईल.

- Advertisement -
वाचा- दिल्लीत एकाच घरामध्ये सापडले ११ मृतदेह!

१० जणांच्या अंगावर काही खूणा

गळ्याला फास लावून स्टुलावरुन उतरल्यानंतर त्यांचे शरीर तडफडले असतील. त्यामुळे त्यांच्या हातापायावर मुकामार लागल्याच्या खूणा सापडल्या आहेत. काहींच्या पायाला स्टुल तर काहींना जवळ असलेला कुलर लागला आहे. पण या खूणा खूनाचा कोणताही संशय व्यक्त करत नाही, हे बुधवारी आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आले आहे.

वाचा-आत्महत्येचे प्लॅनिंग आधीपासूनच?

आत्महत्येआधी खाल्या सुक्या चपात्या

डायरीत लिहिल्याप्रमाणे त्यांना मोक्ष प्राप्तीसाठी रात्री बाहेरुन मागवलेल्या सुक्या चपात्या खायच्या होत्या. रात्री १० ते १०.३० दरम्यान त्यांनी चपात्या खाल्या असे देखील पोस्टमार्टम अहवालात समोर आले आहे. आता आजीचा मृत्यू ही आत्महत्या की, खून हे मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच कळेल.

वाचा-भाटिया कुटुंब आत्महत्येनंतरही आलं परत?
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -