भाटिया कुटुंबाच्या आणखी ‘एका’ सदस्याने सोडले प्राण

भाटिया कुटुंबाच्या आणखी ‘एका’ सदस्याने सोडले प्राण

भाटिया कुटुंबातील शेवटच्या सदस्याचे निधन

दिल्लीतल्या बुराडी आत्महत्या प्रकरणाला आज २३ दिवस पूर्ण झाले. भाटिया कुटुंबियांच्या सामूहिक आत्महत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. मोक्ष मिळवण्यासाठी डायरीत लिहिलेला शब्द आत्महत्या करण्याआधी त्यांनी तंतोतंत पाळला होता. या कुटुंबातील आणखी एका सदस्याने आज प्राण सोडले आहेत. भाटिया कुटुंबाचा लाडका कुत्रा ‘टॉमी’चा मृत्यू झाला असून त्याच्या जाण्याने बुराडीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाचा- बुराडी आत्महत्या प्रकरण : नारायणी देवींच्या मृत्यूचे गूढ उलगडले

तापाने फणफणला होता टॉमी

१ जुलै रोजी भाटिया कुटुंबातील ११ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले.१० जणांचे गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह तर आजीचा मृतदेह दुसऱ्या खोलीत आढळला होता. पोलिसांना ही घटना कळाल्यानंतर त्यांनी भाटिया कुटुंबाच्या घराचा ताबा घेतला. या मृतदेहासोबत त्यांना या घराच्या छतावर त्यांचा कुत्रा टॉमी जिवंत सापडला होता. घरात पोलिसांचा ताफा पाहिल्यानंतर काही काळ टॉमी आक्रमक झाला होता. पण त्यानंतर तो एकदम शांत झाला आणि तापाने फणफणला, अशी माहिती अॅनिमल रेस्क्यू टिमकडून देण्यात आली आहे. पण आज त्याला ह्दयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

वाचा- मोक्ष मिळवण्यासाठी आत्महत्या?

घटनेतून सावरत होता ‘टॉमी’

भाटिया कुटुंबियांच्या मृत्यूनंतर पिटबूल जातीच्या टॉमीला प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. पण पहिले दोन दिवस तो काहीच खात नव्हता. काही दिवसांनी तो नीट जेवू लागला आणि त्याच्या वागण्यात बदल झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. त्याच्या सगळ्या तपासण्या केल्यानंतर तो फिट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पण रविवारी त्याची अचानक तब्येत बिघडली. त्याला ह्रदयविकाराचा झटका आला त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.

वाचा- आत्महत्येचे प्लॅनिंग आधीपासूनच?

घरातील एकमेव सदस्य

भाटिया कुटुंबाच्या आत्महत्येमागचा छडा लावत असताना ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. घरात एकमेव मुका प्राणी टॉमी हाच जिवंत सापडला होता. आता हा एकमेव सदस्यही निघून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वाचा-अंधारावर उत्तर विज्ञानच!
First Published on: July 23, 2018 4:36 PM
Exit mobile version