धक्कादायक! जून महिन्यात दिवसाला सापडणार २ लाख कोरोनाबाधित?

धक्कादायक! जून महिन्यात दिवसाला सापडणार २ लाख कोरोनाबाधित?

जून महिन्यात दिवसाला सापडणार २ लाख कोरोनाबाधित?

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून अनेक देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, असे असून देखील अनेक देशांना याचा फटका बसत आहे. तर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात तर कोरोनाने अक्षरश: कहर केला आहे. तर अमेरिकासाठी जून महिना अधिकच कठीण जाणार आहे. कारण जून महिन्यात अमेरिकेमध्ये कोरोना संकट एक भयंकर रूप धारण करणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत अहवालानुसार, जूनमध्ये अमेरिकेत दिवसाला २ लाख कोरोनाबाधित सापडणार आहेत. तर दररोज ३ हजार मृत्यू होणार आहेत, अशी शक्यता ट्रम्प प्रशासनाने व्यक्त केली आहे. तसेच ट्रम्प प्रशासनाने व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांना परवानगीशिवाय कोणतेही विधान करण्यासही बंदी घातली आहे.

व्हाइट हाऊसच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले की, ‘मुख्य मार्क मिडोच्या परवानगीशिवाय प्रेस आणि इतर कोणालाही कोणतेही निवेदन करू नये. या आदेशाशी संबंधित ईमेल न्यूयॉर्क टाइम्सकडे असून राज्य, आरोग्य, मानवी सेवा, ह्यूमन सर्विसेस, सिक्युरिटी विभागाच्या अधिकाऱ्यांनाही हजर राहण्यास बंदी केली आहे.

अहवालानुसार सांगण्यात आले आहे की, ‘अमेरिकेत दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधितांपैकी १ हजार ७५० जणांचा मृत्यू होत आहे. तसेच यामध्ये ७० टक्क्यांनी वाढ होणार असून जूनमध्ये दररोज २ लाख लोकांना बादा होणार आहे. तर दररोज ३ हजारच्या संख्येने लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. हा अंदाज फेडरल इमरजेंसी मॅनेजमेंट एजन्सीने तयार केलेल्या सार्वजनिक मॉडेलवर आधारित आहे. तसचे मूळ आकडेवारी लपवली जात आहे. कारण आधीच सर्व राज्य बंद आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. त्यामुळे सध्याची सत्य परिस्थिती सांगितली जात नाही.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅट्रिक्सने असेही म्हटले आहे की. ‘ऑगस्टच्या सुरूवातीस अमेरिकेत संक्रमणामुळे १.३५ लाख लोक मृत्यूमुखी पडतील. तसेच अमेरिकेचा आकडा येत्या ११ मेपर्यंत वाढणार आहे.


हेही वाचा – मीडियासमोर आले डुप्लिकेट किम जोंग उन? काय आहे सत्य?


 

First Published on: May 6, 2020 2:35 PM
Exit mobile version