बिहारच्या महागठबंधन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तेजस्वींना आरोग्य तर तेज प्रताप झाले वन आणि पर्यावरण मंत्री

बिहारच्या महागठबंधन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, तेजस्वींना आरोग्य तर तेज प्रताप झाले वन आणि पर्यावरण मंत्री

पाटणा – बिहारच्या महागठबंधन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी राजभवनात पार पडला. त्यासाठी काल रात्री उशिरा ३१ मंत्र्यांची यादी निश्चित करण्यात आली. मंगळवारी यादीत समाविष्ट असलेल्या मंत्र्यांनी गटाने शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांचा समावेश आहे. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत उपेंद्र कुशवाहांचे नाव नव्हते.

शपथ घेतल्यानंतर मंत्र्यांमध्ये खात्यांची विभागणीही करण्यात आली आहे. तेज प्रताप यादव यांना वन आणि पर्यावरण मंत्री करण्यात आले आहे. महाआघाडीच्या मागील सरकारमध्ये तेज प्रताप यांच्याकडे असलेले आरोग्य खाते यावेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गृहखाते आपल्याकडे ठेवले आहे.

मंत्र्यांची यादी अंतिम करण्याचा हा  होता फॉर्म्युला  – 

शपथ घेतलेल्या 31 मंत्र्यांपैकी जनता दल युनायटेड (JDU) कडून 11, राष्ट्रीय जनता दल (RJD) 16, काँग्रेसचे 2 आणि हिंदुस्थानी अवाम मोर्चा (HAAM) कडून 1 मंत्री अशी विभागणी करण्यात आली आहे. एका अपक्षालाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. पुढील मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बड्या चेहऱ्यांना स्थान दिले जाणार आहे.

तेज प्रतापकडे वन-पर्यावरण, तेजस्वीकडे आरोग्य खाते –

मंत्रिमंडळात लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांना आरजेडी कोट्यातून आरोग्यमंत्री बनवण्याची चर्चा होती. मात्र, त्यांना वन आणि पर्यावरण मंत्री करण्यात आले आहे. महागठबंधनच्या मागील सरकारमध्ये आरोग्य खाते तेजप्रताप यांच्याकडे होते, ते यावेळी तेजस्वी यांच्याकडे गेले आहे. तेजस्वी यादव यांच्याकडे आरोग्य, रस्तेबांधणी, नगरविकास आणि ग्रामीण कामे ही चार खाती देण्यात आली आहेत.

राष्‍ट्रीय जनता दल –

जनता दल यूनाइटेड –

कांग्रेस –

हिंदुस्‍तानी अवाम मोर्चा –

अपक्ष आमदार –

First Published on: August 16, 2022 7:54 PM
Exit mobile version