आता कुत्रे शोधणार कोरोनाचा रुग्ण; ब्रिटन देत आहे प्रशिक्षण

आता कुत्रे शोधणार कोरोनाचा रुग्ण; ब्रिटन देत आहे प्रशिक्षण

कुत्र्यांमध्ये वास घेण्याची उत्तम क्षमता असते. या क्षमतेमुळे त्यांचा स्फोटके शोधण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपयोग केला जातो. परंतु कुत्रे कोविड -१९ चा रुग्ण शोधू शकतात का? माात्र, एका ब्रिटीश संस्थेचा यावर विश्वास आहे. चॅरिटेबल सोसायटी ऑफ ब्रिटेनने कोरोना विषाणूचा वास घेण्यासाठी प्रशिक्षण सुरु केलं आहे. या संस्थेतील कुत्र्यांनी याआधी विविध आजारांच्या रुग्णांचा वास घेत त्यांना शोधलं आहे. कुत्र्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी सन २००८ मध्ये स्थापन केलेली मेडिकल डिटेक्शन डॉग्‍स (Medical Detection Dogs) या संस्थेने या प्रकल्पावर काम करण्यास सुरवात केली आहे.

मध्य इंग्लंडमधील मिल्टन केन्सच्या प्रशिक्षण कक्षात, कुत्र्यांना विषाणूचे नमुने वास घेण्यासाठी दिले आहेत. यासाठी सखोल प्रशिक्षण दिलं जात आहे जेणेकरुन ते त्यावर संकेत देऊ शकतील आणि नंतर उपचार सुरू करता येतील. प्रत्येक रोग एक विशिष्ट वास सोडतो, ज्याला कुत्रे सहज पकडू शकतात. यामुळे या पद्धतीचा वापर करण्याचा विचार आहे. संस्थेने यापूर्वी कर्करोग, पार्किन्सन रोग आणि जिवाणू संक्रमण रूग्णांचा शोध घेतला आहे.


हेही वाचा – Coronavirus: अमरनाथ यात्रा केली रद्द; कोरोनामुळे घेतला निर्णय


मेडिकल डिटेक्शन डॉग्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्लेअर गेस्ट यांनी एएफपीला सांगितलं की, “आमचा विश्वास आहे की कुत्रे कोविड -१९ चे रुग्ण शोधू शकतात आणि यामुळे शेकडो लोकांची वेगवान स्क्रीनिंग करू शकता येईल. यामुळे आपल्याला कोणाची चाचणी करणे आवश्यक आहे हे कळेल आणि आमच्याकडे पुरावे आहेत की कुत्रे जीवाणू आणि इतर रोग शोधू शकतात.” गेस्ट ईशान्य इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (एलएसएचटीएम) आणि डर्हॅम युनिव्हर्सिटी सोबत काम करत आहेत.

 

First Published on: April 22, 2020 9:55 PM
Exit mobile version