चक्क विमानावर छापले ‘चुकीचे’ नाव!

चक्क विमानावर छापले ‘चुकीचे’ नाव!

आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक पाट्या/फलक पाहतो ज्यावरील इंग्रजी शब्दाचं स्पेलिंग चुकीचं असतं. एखाद्या छोट्याशा दुकानाच्या किंवा गॅरेजच्या पाटीवर इंग्रजी शब्दांच्या या चुका आपल्याला सहसा आढळतात. मात्र, एखाद्या मोठ्या ब्रँडला अशाप्रकारे स्पेलिंगमधली छोटीशी चूकही महागात पडू शकते. कारण मोठ्या ब्रँड्ससाठी त्यांचं ‘नाव’ हेच सर्वकाही असतं. मात्र, नुकतंच ‘कॅथे पॅसिफिक’ या जगविख्यात एअर लाईन कंपनीने असाच स्पेलिंगचा घोळ घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे. हाँगकाँगच्या कॅथे पॅसिफिक (Cathye Pacific) या कंपनीने थेट त्यांच्या विमानावरच चुकीचे नाव छापले होते. चुकीचे इंग्रजी नाव छापलेले हे विमान ज्यावेळी हाँगकाँग एअरपोर्टवर आले त्यावेळी तिथल्या एका प्रवाशाचा ही चूक लक्षात आली. त्यानंतर तातडीने त्याने ही बाब कॅथे पॅसिफिक कंपनीच्या लक्षात आणून दिली.

काय होती ‘ती’ चूक?

कॅथे पॅसिफिक या नावाचं इंग्रजी स्पेलिंग Cathye Pacific असं आहे. मात्र, विमानावर Pacific ऐवजी Paciic असं स्पेलिंग छापण्यात आलं होतं. म्हणजेच Pacific या शब्दात ‘F’ च्या जागी ‘i’ छापला गेला होता. कंपनीच्या या घोडचुकीमुळे सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे या सगळ्याला उत्तर देण्यासाठी एअर लाईन कंपनीने एक गमतीशीर आणि मिश्कील ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय, की ‘आमच्या विमानाचा हा नवीन ड्रेसकोड/पोषाख जास्त काळ राहणार नाही. लवकरच ते चेंजसाठी पुन्हा दुकानात जाईल’.

सोशल मीडियावर ट्रोल

दरम्यान कॅथे पॅसिफिक एअरलाईनच्या या चुकीमुळे नेटिझन्सकडून त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. पाहुया याचीच काही गमतीशीर उदाहरणं :

 

First Published on: September 22, 2018 12:23 PM
Exit mobile version