Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली फाउंडेशनला दान दिल्यास मिळेल टॅक्समध्ये सूट

Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली फाउंडेशनला दान दिल्यास मिळेल टॅक्समध्ये सूट

Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली फाउंडेशनला दान दिल्यास मिळेल टॅक्समध्ये सूट

Patanjali Research Foundation Trust: बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पंतजली रिसर्च फाउंडेशन ट्र्स्टला पाच वर्षांसाठी करात सूट दिली आहे. यामुळे पंतजली ट्रस्टला देणगी देणाऱ्या देणगीदारास देणग्यांच्या बदल्यात करात सूट मिळणार आहे. ही सूट यापूर्वीही देण्यात आली होती. मात्र ती ती पून्हा पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका अधिसूचना जाहीर करत म्हटले आहे की, पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्टला २०२१-२२ ते २०२६-२७ दरम्यान देणगी देणाऱ्या कंपन्या त्यावर कर सूट मागू शकतात.

अशी कर सवलत कोणत्याही विद्यापीठ, महाविद्यालये आणि वैज्ञानिक संशोधनासंबंधीत संस्थांना दिली जाते. याचा अर्थ असा की, जर एखादी व्यक्ती किंवा संस्था पंतजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्टला कोणताही देणगी देत असेल तर करपात्र उत्पन्नातून कंपनीनीचे देणगी समान रक्कम वजा केली जाईल. त्यामुळे त्या कंपनीचे करपात्र उत्पन्न कमी होईल.

 कधीपर्यंत मिळेल सूट?

प्राप्तिकर विभागाशी संबंधित केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या एका अधिसुचनेत म्हटले की, केंद्र सरकारने आयकर १९६१ च्या कलम ३५ चे उपकलम (१) च्या कलम (ii) च्या ऑब्जेक्ट अंतर्गत वैज्ञानिक संशोधनासाठी अधिसूचना जारी केली आहे. मेसर्स पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट, हरिद्वार यांना ‘असोसिएशन’च्या प्रकारात मान्यता देण्यात आली आहे. या अधिकृत राजपत्र प्रकाशित होण्याच्या तारखेपासून ते लागू होईल आणि २०२२-२३ ते २०२७-२८ पर्यंत मूल्यांकन वर्ष लागू असेल. या सूटशी जोडल्या गेलेल्या अनेक अटी आहेत. पतंजलीला खात्री करून घ्यावी लागेल की ‘संशोधन उपक्रम’ त्याद्वारेच चालविला जाईल. विविध गटांकडून मिळालेल्या देणग्या, किती देणगी मिळाली आणि संशोधनावर किती पैसे खर्च झाले, याविषयी पतंजलीला स्वतंत्र पूर्ण स्टेटमेंट द्यावे लागेल.

पतंजलीचा आलेख वाढता

कोरोना साथीच्या काळातही बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपने २०२०-२१ या आर्थिक वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. पतंजली समूहाचे एकूण उलाढाल ३० कोटींच्या पुढे गेली आहे. यामुळे पतंजलीने हिंदुस्तान युनिलिव्हर वगळता इतर सर्व एफएमसीजी कंपन्या मागे टाकले आहे.


 

First Published on: July 14, 2021 6:40 PM
Exit mobile version