Yes Bank: २०० कोटींचा गंडा; सारंग आणि राकेश वाधवानवर गुन्हा दाखल

Yes Bank: २०० कोटींचा गंडा; सारंग आणि राकेश वाधवानवर गुन्हा दाखल

HDIL चे प्रमोटर्स सारंग आणि राकेश वाधवान यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येस बँकेला २०० कोटींचा गंडा लावल्याप्रकरणी सारंग आणि राकेश वाधवानवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई सीबीआयने केली असल्याचे सांगितले जात आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, Yes बँकेने मॅक स्टारला लोन दिले होते मॅक स्टार ही HDIL ची अल्प समभागधारक कंपनी आहे. दरम्यान या प्रकरणी सारंग वाधवान यांनी हे आरोप फेटाळल्याचे समजते आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने मुंबईतल्या वाधवान यांच्या दहा ठिकाणी सर्च ऑपरेशन केले आहे.

असा घडला होता प्रकार

बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधू कुटुंबासोबत लॉकडाऊनच्या काळातही महाबळेश्वरला गेले होते. ज्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. वाधवान कुटुंबापैकी काही जणांना करोनाची लागण झाली असू शकते म्हणून कुटुंबाचे विलीगीकरण करण्याचा निर्णय सीबीआयने घेतला होता. त्यांना लॉकडाऊनच्या काळात प्रवासाची संमती कशी मिळाली हा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता.

दरम्यान येस बँकेच्या २०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सारंग आणि राकेश वाधवानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे. यामुळे सारंग आणि राकेश वाधवान यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे दिसतेय.


TRP RACKET :रिपब्लिकच्या CFO सह दोन जाहिरात कंपन्यांना समन्स

First Published on: October 9, 2020 8:57 PM
Exit mobile version