CBI अधिकाऱ्याच्याच घरावर सीबीआयचा छापा

CBI अधिकाऱ्याच्याच घरावर सीबीआयचा छापा

देशात जेव्हा एखादी गंभीर आणि घटना घडते आणि त्या प्रकरणात पोलिसांचा तपास पुरेसा नसतो, तेव्हा हे प्रकरण देशातील प्रसिद्ध तपास संस्था केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) कडे सोपवले जाते. यानंतर मग सीबीआय या खटल्याची संपूर्ण अंमलबजावणी करते. तसेच खर्‍या आरोपीला शिक्षा झाली असा निष्कर्ष काढला जातो. जसे की नुकताच सुशांत प्रकरण समोर आले आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण पोलिसांच्या तपासानंतर सीबीआयकडे सोपवले गेले होते. मुंबई पोलिसांनी सुशांस सिंह राजपूत प्रकरणात चौकशी केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायलयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले होते. सीबीआयने या प्रकरणात चौकशी करत सुशांतने आत्महत्या केल्याचा निर्णय जाहीर केला होता. या घटनेनंतर धक्कादायक माहिती अशी आहे की, सीबीआय अधिकाऱ्याच्याच घरी सीबीआयने छापेमारी केली आहे.

सीबीआय अधिकाऱ्याचा घरावर छापा

सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) अधिकाऱ्याने चूक केल्यास किंवा स्वत: ला फसवले तर काय होईल याचा विचार करणे थोडेसे विचित्र वाटत असेल, कारण सीबीआय ही देशाची एक प्रामाणिक एजन्सी मानली जाते जी कोणत्याही परिस्थितीत निःपक्षपाती आहे. परंतु या प्रकरणात स्वतः सीबीआय दोषी आहे. सीबीआयचे पथक गाझियाबादमधील कौशांबी येथील माजी सीबीआय अधिकारी, भ्रष्टाचारविरोधी शाखा प्रमुख (DSP) आरके आरके. ऋषींच्या घरी छापा टाकला आहे. सीबीआयचे माजी उप-जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या फ्लॅटवर छापा टाकण्यात आला आहे.

१२ अधिकाऱ्यांच्या पथकाने टाकला छापा

सीबीआयच्या १२ अधिकाऱ्यांची टीम सकाळी साडेआठच्या सुमारास सीबीआय अधिकाऱ्यांच्या फ्लॅटवर पोहोचली आणि कारवाई सुरुवात केली. सीबीआय टीम कारवाई पूर्ण करून दुपारी दीड वाजता परतली. अधिकाऱ्यांनी घरातील सर्व सदस्यांचीही विचारपूस केली. सध्या या प्रकरणात फारशी माहिती समोर आली नाही, कारण आरडब्ल्यूए आणि शिवालिक टॉवरच्या इतर अधिकाऱ्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे.

First Published on: January 14, 2021 5:02 PM
Exit mobile version