अबब… निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात सापडले 38 कोटी रुपये कॅश; वाचा, कोण आहे ‘हा’ अधिकारी

अबब… निवृत्त अधिकाऱ्याच्या घरात सापडले 38 कोटी रुपये कॅश; वाचा, कोण आहे ‘हा’ अधिकारी

CBI seizes 38 crores 38 lakhs repees rajender kumar Gupta wapcos water power consultancy fromer CMD delhi

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. जलशक्ती मंत्रालांतर्गत पाणी आणि ऊर्जा सल्लागार कंपनी (WAPCOS) चे माजी व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) राजेंद्रकुमार गुप्ता यांच्या घरावर छापे टाकून सीबीआयने रोख 38 कोटी 38 लाख रुपये जप्त केले आहेत. ( CBI seizes 38 crores 38 lakhs repees rajender kumar Gupta wapcos water power consultancy fromer CMD delhi )

जलशक्ती मंत्रालयाच्या माजी सीएमडीच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. दिल्ली आणि चंदीगढसह देशभरातील त्यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली. छापेमारीत 38 करोड 38 लाख रोख रक्कम आढळून आली आहे. तसंच, काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. आरोपी राजेंद्र कुमार गुप्ता हे वा‌‌‌ॅटर अँड पॉवर कन्सल्टन्सीमध्ये सीएमडी म्हणून काम करत होते. ही विभाग जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतो.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र कुमार गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्तेसाठी गुन्हा नोंदवल्यानंतर आम्ही दिल्ली, चंदीगढ, पंचकुला, गुरुग्राम, सोनीपत आणि गाझियाबादसह सुमारे 19 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यादरम्यान 38 कोटी 38 लाख रोख रक्कम आणि त्या मालमत्तेशी संबंधित काही कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तूही जप्त केल्या आहेत.

सुटकेस आणि बेडमध्ये रोख रक्कम ठेवल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. सीबीआयने छापेमारीत तपास केला असता त्यांना ही रोकड घरातच सापडली. सीबीआयने यासंदर्भात बोलताना सांगितले की, पुढील तपास सुरु असून हा पैसा कुठून आला याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, हे सर्व समोर आल्यानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होतील.

( हेही वाचा: कर्नाटक पाठोपाठ बजरंग दलावर बंदी आणण्याचा ‘हे’ राज्यही करणार विचार )

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत आरोपींकडून रोख रक्कम, गुन्ह्याची कागदपत्रं, दागिने आणि डिजिटल उपकरणे असे सुमारे 20 कोटी जप्त करण्यात आले आहेत. सध्या तपास सुरु आहे. WAPCOS च्या माजी CMD विरुद्धचा आरोप असा आहे की, त्यांच्याकडे 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2019 या कालावधीत त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता होती. वाप्कोस हे जलशक्ती मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सरकारच्या मालकीतील केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. हे पूर्वी वॉटर अँड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून ओळखलं जात असे.

First Published on: May 3, 2023 9:12 PM
Exit mobile version