घरदेश-विदेशकर्नाटक पाठोपाठ बजरंग दलावर बंदी आणण्याचा 'हे' राज्यही करणार विचार

कर्नाटक पाठोपाठ बजरंग दलावर बंदी आणण्याचा ‘हे’ राज्यही करणार विचार

Subscribe

 

नवी दिल्लीः कर्नाटकमध्ये बजरंग दलवर बंदी आणण्याचा जाहिरनामा कॉंग्रेसने प्रसिद्ध केला आहे. तशाच प्रकारचा निर्णय छत्तीसगडमध्येही घेतला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्पष्ट केले. बजरंग दलवर बंदी आणण्याचा निर्णय आम्हीही घेऊ शकतो. तूर्त कर्नाटकमधील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तेथे तसा जाहिरनामा कॉंग्रेसने प्रसिद्ध केला आहे, असे मुख्यमंत्री बघेल यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्री बघेल म्हणाले, जी गोष्ट पाकिस्तानची आहे ती भारताची असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत फिरतात. आता बजरंग दलवर बंदी आणण्याचा विषय सुरु आहे. बजरंगबली यांच्यासंदर्भात जाहिरनामा नाही. पण पंतप्रधान मोदी हे अजब दावा करत आहे. बजरंग बली नावावरुन दादागिरी सुरु आहे, असा कांगावा मोदी करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. छत्तीसगडमध्ये बजरगं दल गडबड करत होता. आम्ही त्यांना सरळ केले. वेळ आली तर बजरंग दलवर बंदीदेखील आणू.

मात्र भाजप प्रदेश महामंत्री विजय शर्मा यांनी बजरंग दलवर बंदी आणण्याच्या कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यावर टीका केली आहे. बजरंग दल आणि पीएफआईवर बंदी आणण्याचा जाहिरनामा आणून कॉंग्रेसने सिद्ध केले की ते हिंदुविरोधी आहेत. मुळात केंद्र सरकारने सन २०२२ मध्येच पीएफईवर बंदी आणली आहे. त्यामुळे बजरंग दलवर बंदी आणण्याची घोषणा करुन कॉंग्रेस हिंदुंची बदनामी करत आहेत.

- Advertisement -

भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुण साव म्हणाले, बजरंग दल हे बजरंग बली प्रमाणे अमर आहे. कॉंग्रेस सनातन धर्म आणि त्यांच्या रक्षकांचा द्वेष करते. बजरंग दलवर आरोप करणे योग्य नाही. कॉंग्रेस हिंदुविरोधी असल्याचे यातून स्पष्ट होते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा जाहिरनामा कॉंग्रेसने प्रसिद्ध केला. बजरंग दलवर बंदी आणण्याचे आश्वासन कॉंग्रेसने जाहिरनाम्यात दिले आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बजरंग दलची तुलना अतिरेकी संघटनेसोबत केल्याने विश्व हिंदू परिषदने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रायपूर येथील शंकर नगरमध्ये शहीद भगत सिंह चौकात कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा पुतळा जाण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -