सीबीएसीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणार अधिक मेहनत

सीबीएसीच्या विद्यार्थ्यांना करावी लागणार अधिक मेहनत

( फोटो प्रातिनिधीक आहे)

२०२०मध्ये सेंट्रल ऑफ सेंकडरी एज्युकेशन बोर्ड ( CBSE) बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण सीबीएसई १०वी आणि १२ वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बदल करणार आहे. या बदलानुसार व्होकेशनल परीक्षांचे पेपर सुरुवातीला होतील, अशी माहिती सीबीएसईकडून देण्यात आली आहे. पुढील वर्षापासून हा नवा पेपर पॅटर्न लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना  गूणांसाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे.

आकलन क्षमतेवर अधिक भर

बदल करण्यात आलेल्या पेपर पॅटर्नमध्ये आकलन क्षमतेवर भर देणारे प्रश्न विचारले जाणार आहे. मुलांना पुस्तकी ज्ञानातून बाहेर काढण्यासाठी सीबीएसईकडून हा बदल करण्यात आला आहे. मुलांनी पुस्तकातील प्रश्नांची उत्तरे नुसती पाठ करु नयेत तर त्यातून त्यांना काहीतरी आकलन व्हावे, असा सीबीएसईचा प्रयत्न आहे. या नव्या बदलानंतर शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर देखील लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. एकूणच हा बदल विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेत वाढ होण्यासाठी केला जाणार आहे. या संदर्भातील प्रस्तावित बदल मंत्रालयात पाठवण्यात आले असून या बदलाला ३ ते ४ महिन्यांचा कालावधी जाईल असे असले तरी प्रश्नपत्रिका बदलाची सुरुवात ही सीबीएसईकडून करण्यात आली आहे.

अशी असेल प्रश्नपत्रिका

१. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे प्रॉब्लेम सॉल्विंग आणि विश्लेषणात्मक असणार
२. थोडक्यात उत्तरे द्या या प्रश्नांचा समावेश अधिक
३. विद्यार्थ्यांच्या क्रिटिकल एबिलिटी चाचणीसाठी प्रश्न

परीक्षांचा वेळापत्रकात बदल

१. व्होकेशन विषयांच्या परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार, मुख्य विषयांच्या परीक्षा मार्चमध्ये संपणार
२. वेळापत्रकाच्या बदलामुळे निकालासाठी अधिक वेळ मिळणार

First Published on: August 23, 2018 5:26 PM
Exit mobile version