पुराव्याची गरज नाही, टुलकिट काँग्रेसचे असल्याचे सिद्ध झाले; प्रकाश जावडेकर यांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

पुराव्याची गरज नाही, टुलकिट काँग्रेसचे असल्याचे सिद्ध झाले; प्रकाश जावडेकर यांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

पुराव्याची गरज नाही, टुलकिट काँग्रेसचे असल्याचे सिद्ध झाले; प्रकाश जावडेकर यांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला अजूनही कोरोना समजलेला नाही, असे बोलत आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी आणि केंद्र सरकावर टीका केली. राहुल गांधींना प्रत्यत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी टूलकिट प्रकरणावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आता पुराव्याची गरज नाही, टुलकिट काँग्रेसचे असल्याचे सिद्ध झाले, असे जावडेकर म्हणाले. तसेच त्यांनी देशाला उपदेश देण्याऐवजी राजस्थानमधली परिस्थिती पाहावी, असा सल्ला राहुल गांधी यांना दिला.

प्रकाश जावडेकर काय म्हणाले?

प्रकाश जावडेकर म्हणाले की, ‘आज लसीकरण होत नाही असा सवाल उपस्थितीत केला. पण लसीकरण होत आहे. मात्र आजचे तुमचे विधान ऐकून हे निश्चित झाले की, आता पुराव्याची गरज नाही. टुलकिटची निर्मिती तुमचीच असल्याचे सिद्ध झाले. कारण ज्याप्रकारची भाषा, ज्याप्रकारचे तर्क, ज्याप्रकारे आपण लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा आणि भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे त्याचं रणनीतिचा भाग आहे.’

पुढे जावडेकर म्हणाले की, ‘राहुलजी जरा राजस्थानमध्ये जा, तिथे बलात्कार होत आहेत. याच आठवड्यात एका रुग्णवाहिकाचा उपयोग बलात्कार करण्यासाठी केला. तसेच प्रत्येक रुग्णालयात व्हेंटिलेटर व्यवस्थित नसल्यामुळे ४०० लोकांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वी घुमंतू जातीतील लोकांची झोपटी पाडली. महिला खासदार रणजीता कोळी यांच्यावर काँग्रेसच्या गुंडानी हल्ला केला. पण त्या वाचल्या, परंतु त्यांच्या विरोधात असे का केले? कारण, त्या पीएससीमध्ये जाऊन १२-१५ लोकांची मदत करत होत्या. अशा काम करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला होतो, ही राजस्थानची कायदा व सुव्यवस्था आहे. बलात्कार इतके झाले. त्याचे गुन्हेगार पकडले गेले नाहीत, शिक्षा होणे तर दूरची गोष्ट आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देशाला उपदेश देण्याऐवजी राजस्थान आणि आपल्या राज्यांकडे पाहा. देशाला विश्वास आहे, डिसेंबरपर्यंत १०० कोटींहून जास्त लोकांचे लसीकरण पूर्ण होईल.

राहुल गांधी काय म्हणाले होते….

देशामधील कोरोनाच्या परिस्थितीला मोदीच जबाबदार आहेत. त्यांनी विरोधी पक्षाचे काही ऐकले नाही. भारत वॅक्सीन कॅपिटल असूनही मोदींनी लसी निर्यात केल्या. देशातील लोकांना वारेवर सोडले. लसीकरणाचे नियोजन करून वेग वाढवावा अन्यथा देशात तिसरी, चौथीच नाही तर अनेक लाटा येतील, असा आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला इशारा दिला.


हेही वाचा – दोघांमधील फरक स्पष्ट, हेतूही स्पष्ट, अजूनही वेळ गेलेली नाही, अशोक चव्हाण यांचा भाजपला इशारा


 

First Published on: May 28, 2021 3:09 PM
Exit mobile version