बनावट हेल्मेट, कुकर, गॅस सिलेंडर विकणाऱ्यांनो सावधान! केंद्र सरकार करणार कडक कारवाई

बनावट हेल्मेट, कुकर, गॅस सिलेंडर विकणाऱ्यांनो सावधान! केंद्र सरकार करणार कडक कारवाई

बनावट हेल्मेट, कुकर, गॅस सिलिंडर विकणाऱ्यांनो सावधान! केंद्र सरकार करणार कडक कारवाई

घरगुती किंवा रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकार आत्ता बनावट उत्पादनांची विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणार आहे. यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) देशव्यापी मोहीम राबवणार आहे. यात बनावट IS स्टॅम्प असलेला प्रेशर कुकर, दुचाकी हेल्मेट आणि घरगुती सिलेंडर विकणाऱ्यांविरुद्ध नागरिकांमध्ये जगजागृती व्हावी यासाठी ही देशव्यापी मोहीम सुरू केली जात आहे. यात CCPA ने आत्ता अॅमेझॉन, फ्लिपकार्ड आणि पेटीएम, मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांनाही अशा वस्तू विकू नये यासाठी नोटीस बजावली आहे.

CCPA च्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी सांगितले की, किरकोळ विक्रेत्यांसह अनेक ऑनलाइन कंपन्या भारतीय मानक ब्युरोच्या मापदंडाची पूर्तता न करता बनावट प्रेशर कुकर आणि इतर वस्तूंची खुलेआम विक्री करत आहेत. यामुळे भारतीय मानक ब्युरोच्या नियमांची पूर्तता न करणाऱ्या अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना यापूर्वीच नोटीस बजावल्या आहेत.

दरम्यान ऑनलाईन पद्धतीनेच नाही तर देशात ऑफलाईन पद्धतीने देखील घरगुती उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री होतेय. मात्र या वस्तूंच्या विक्रीवरही सीसीपीए लक्ष ठेवणार आहे. या बनावट वस्तूंची विक्री थांबण्यासाठी देशव्यापी मोहिमेअंतर्गत प्रेशर कुकर, हेल्मेट आणि घरगुती गॅस सिलेंडरवर भर दिला जातोय. असंही खरे म्हणाल्या.

जिल्हा पातळीवर होणार गुन्हा दाखल

बाजारातील बनावट उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी CCPA ने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ज्या कंपन्यांविरुद्ध ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यांची चौकशी करण्यास आदेश दिले आहेत. यामुळे जिल्हाधिकारी आपल्या अधिकारक्षेत्रातील प्रकरणांवर कारवाई करुन दोन महिन्यांत याचा सविस्तर अहवाल देणार आहे. याशिवाय सीसीपीए बनावट उत्पादनांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी सर्व ई कॉमर्स वेबसाईट्सवर नजर ठेवून असल्याचे निधी खरे यांनी सांगितले.

हेल्मेट, कुकर, सिलेंडर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

१) या वस्तू खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी त्यावरील BIS चे भारतीय मानक (IS) चिन्ह तपासा.

२) ग्राहकांनी या वस्तूंवर IS चिन्ह पाहिल्यानंतरच वेबसाइटवरून ऑर्डर करा.

३) प्रेशर कुकर, दुचाकी हेल्मेट आणि एलपीजी सिलेंडरची आयएस चिन्हाशिवाय विक्री करता येत नाही याची ग्राहकांनी दक्षता घ्यावी.

४) तसेच हेल्मेटवर IS 4151:2015 चिन्ह आणि प्रेशर कुकरवर IS 2347:2017 पाहिल्यानंतरच ते खरेदी करावे.


 

First Published on: November 25, 2021 12:41 PM
Exit mobile version