New Guidelines: सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंबंधित केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी

New Guidelines: सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंबंधित केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स जारी

सरकारी कार्यालयात पुन्हा बायोमेट्रिक पद्धत सुरु, १०० टक्के उपस्थितीचे आदेश

कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाने सोमवारी अवर सचिव आणि त्यावरील पातळीवरचे सर्व अधिकाऱ्यांना १६ जूनपासून ते ३० जूनपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. दिव्यांग व्यक्ती आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा नियम कायम ठेवला आहे. पण अवर सचिव यांच्या खालच्या स्तरावरील ५० टक्के सरकारी अधिकारी सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयामध्ये उपस्थित राहतील आणि उर्वरित घरातून काम करतील. केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालय/विभागांमध्ये जारी केलेल्या आदेशात हे नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाबाधितांमध्ये आणि पॉझिटिव्हीटी रेटमध्ये घसरण झाल्यानंतर कामगार मंत्रालयाने सरकार कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये सांगण्यात आले आहे की, अवर सचिव आणि त्याच्यावरील स्तरातील सर्व सरकार कर्मचाऱ्यांनी सर्व कामकाजा दिवशी कार्यालयामध्ये उपस्थित राहा. यावेळी सर्व अधिकाऱ्यांना/कर्मचाऱ्यांना कोरोना संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागले.

आदेशात आणखीन काय सांगण्यात आले आहे?

सतत हात धुणे, सॅनिटाईज करणे, मास्क घालणे, प्रत्येक वेळेस सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे या गोष्टी कराव्या लागतील. यामध्ये थोडासा जरी हलगर्जीपणा झाला तर ते गंभीरपणे घ्यावे लागेल. कार्यालयात गर्दीपासून वाचवण्यासाठी अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी वेळी उपस्थित राहावे. सकाळी ९ ते संध्याकाळी ५.३०, सकाली ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आणि सकाली १० ते सायंकाळी ६.३० पर्यंत वेळ निश्चित करावी.

दिव्यांग व्यक्तींना आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये न येण्याची सूट कायम ठेवली आहे. पुढील आदेश येईपर्यंत त्यांना घरातून काम करावे लागले. कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांना जोपर्यंत त्याचा भाग कंटेनमेंट झोनमुक्त होत नाही तोपर्यंत त्यांना कार्यालयात न येण्याची सूट दिली गेली आहे. जे अधिकारी / कर्मचारी कार्यालयात येते नाहीत त्यांनी घरातून काम करा आणि प्रत्येक वेळेस संपर्कासाठी टेलिफोन किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर उपलब्ध राहा. व्हिसीच्या माध्यमातून बैठका आयोजित केल्या जातील. १६ जूनपासून ते ३० जूनपर्यंत हे आदेश लागू राहतील. यादरम्यान बायोमॅट्रिक हजेरी बंद असेल आणि आदेश येईपर्यंत रजिस्टरचा वापर केला जाईल.


हेही वाचा – Coronavirus: कोरोना प्रसार रोखण्यासाठी मधुमेहाचे औषधं असरदार, नवा शोध


 

First Published on: June 15, 2021 1:52 PM
Exit mobile version