घरताज्या घडामोडीCoronavirus: कोरोना प्रसार रोखण्यासाठी मधुमेहाचे औषधं असरदार, नवा शोध

Coronavirus: कोरोना प्रसार रोखण्यासाठी मधुमेहाचे औषधं असरदार, नवा शोध

Subscribe

कोरोना काळाच्या सुरुवातीपासून जगभरात याच्या चाचण्यापासून या प्रतिबंधात्मक औषधांपर्यंत संशोधन केले जात आहे. अजूनपर्यंत कोरोना पूर्णपणे बरा होईल अशा औषधाचा शोध लागला नाही आहे. परंतु सध्या उपस्थित असलेल्या औषधाचे संशोधन केले जात आहे. एका नव्या संशोधनानुसार, कोरोनाच्या या संकट काळात मधुमेहाच्या एका औषधामध्ये आशेचा किरण दिसत आहे. हे औषध कोरोनाच्या लढाईत उपयुक्त ठरू शकते. संशोधकांनुसार, रक्तातील साखर कमी करणारे मेटफॉर्मिन नावाचे औषधं फुफ्फुसातील संसर्ग रोखू शकते. फुफ्फुसातील संसर्ग कोरोनाचा धोका आणि मृत्यूचा धोका वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे मेटफार्मिन औषध कोरोनाबाधितांसाठी असरदार असल्याचा दावा अमेरिकेच्या अभ्यासातून करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे संशोधकांनी उंदरावर अभ्यास करून या आधारावर मधुमेहाच्या औषधासंबंधित दावा केला. टाईप-२ मधुमेहग्रस्त असलेल्या व्यक्तीवर सामान्यातः सुरुवातील उपचारासाठी मेटफार्मिनचा वापर केला जातो. किडनीमधील ग्लूकोज कमी करणे आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी हे औषध मदत करते. या औषधांचा कोरोना रुग्णांवर कसा परिणाम होतो हे शोधसाठी संशोधकांनी एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (Acute respiratory distress syndrome (ARDS)) पीडित उंदरांवर याचा अभ्यास केला.

- Advertisement -

एआरडीएस एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये फुफ्फुसांध्ये द्रव्य पदार्थ जमा होऊन श्वास घेण्यास अडचणी निर्माण होतात आणि अवयवांपर्यंत ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ही स्थिती जीवघेणी असते. रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये ही स्थिती मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. ऑनलाईन असलेल्या एका मासिकेत प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, उंदारमधील एआरडीएस रोखण्यासाठी मेटफार्मिन औषध प्रभावी ठरले आहे.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटला ओळखण्यासाठी महाराष्ट्रातून नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -