चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नजरकैदेत

चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नजरकैदेत

चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नजरकैद

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपीचे पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश या दोघांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशात एका टीडीपी नेत्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या विरोधात चंद्राबाबू नायडू आंदोलन छेडण्यात होते. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनाने पोलिसांनी चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या मुलगा नारा लोकेशला त्यांच्या राहत्या घरी नजकैद केले आहे. पोलीस चंद्राबाबूंना घराबाहेर पडू देत नाही आहेत. त्याचबरोबर टीडीपीचे अनेक कार्यकर्त्ये चंद्राबाबूंच्या घराबाहेर आले आहेत. पोलीस त्यांनाही चंद्राबाबूंच्या भेटीसाठी जावू देत नाही.

हेही वाचा – चंद्रकातदादांना सुबुद्धी दे रे बाप्पा…

नजरकैदेच्या विरोधात चंद्राबाबूंचे उपोषण

पोलिसांनी नजरकैद केल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपोषण करायचे ठरवले आहे. चंद्राबाबूंच्या उपोषमाची माहिती मिळताच त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली. मात्र, पोलिसांनी त्यांना आता प्रवेश दिला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

आंध्र प्रदेशच्या गुटुंर येथे टीडीपी नेते उमा यादव यांची तीन इसमांनी चाकू खोपसून हत्या केली होती. ही घटना २५ जून २०१९ रोजी घडली होती. या हत्येला दोन महिने झाले तरीही आरोपींचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. आंध्र प्रदेशमध्ये वाईएसआर काँग्रेसची सत्ता आल्यापासून टीडीपी कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, असा दावा टीडीपीच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. दरम्यान, हल्लेखोरांना पकडण्यात न आल्यामुळे चंद्राबाबू आज आंदोलन करणार होते. मात्र, त्यांना पोलिसांनी नजरकैद केले.

First Published on: September 11, 2019 10:28 AM
Exit mobile version