भाजपला संपवण्यासाठी नायडू – ममता बॅनर्जी एकत्र!

भाजपला संपवण्यासाठी नायडू – ममता बॅनर्जी एकत्र!

भाजपला संपवण्यासाठी नायडू - ममता बॅनर्जी एकत्र!

गेल्या काही दिवसांपासून राजकीय पटलावर २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला संपवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन महाआघाडी करणार असल्याची चर्चा रंगली होती. आता या चर्चेचे वास्तवात मार्गक्रमण होताना दिसत आहे. आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत घोषणा केली आहे. देशाला भाजपापासून वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आणि आम्ही आमची महाआघाडी स्थापन केली आहे, असे ममता बॅंनर्जी म्हणाल्या. भाजपविरोधात रणनिती ठरवण्यासाठी ममता बॅनर्जी आणि चंद्रबाबु नायडू या दोघांमध्ये आज भेट झाली. भाजप विरोधात चंद्रबाबु नायडू आणि ममता बॅनर्जी यांनी महाआघाडी उघडली आहे.

हेही वाचा – नायडू – ममता बॅनर्जी यांची भेट निश्चित

ममता बॅंनर्जी आणि चंद्राबाबूंची झाली भेट

आज ममता बॅंनर्जी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची भेट झाली आहे. या भेटीनंतर ममता बॅंनर्जी यांनी महाआघाडीची घोषणा केली. यावेळी दोघांनी भाजवर जोरदार टीका केली. माध्यमांशी बोलताना ममता म्हणाल्या की, देशाला भाजपापासून वाचवायला हवे. त्यासाठी आम्ही एकत्र आले आहोत. या कामासाठीच आज आम्ही भविष्याच्या कामाचा आराखडा तयार केला असल्याचेही ममता म्हणाल्या आहेत.

हेही वाचा – मंत्री, अधिकाऱ्यांचे ‘लाड’ बंद! ममता बॅनर्जींचा महत्त्वपूर्ण निर्णय

काय म्हणाले चंद्राबाबू नायडू?

चंद्राबाबू नायडू म्हणाले की, ज्येष्ठ नेते असल्या कारणाने ममता बॅंनर्जी आणि माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. आपल्याला या लोकशाहीला वाचवायला हवे. सध्या सरकारकडून सीबीआय, इडी आणि आरबीआय बॅंक यांच्यावर दबाव टाकला जात आहे. आपल्याला या संस्थाना टिकवायला हवे. या संस्थेला टिकवण्यासाठी आपण महाआघाडीच्या रुपाने एकत्र आलो असल्याचेही ते म्हणाले.


हेही वाचा – तिसरी आघाडी नको, महाआघाडी करूया

First Published on: November 19, 2018 10:08 PM
Exit mobile version