दिल्ली हिंसाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल, ताहिर हुसेन हिंसाचाराचा मुख्य सुत्रधार

दिल्ली हिंसाचार प्रकरणी आरोपपत्र दाखल, ताहिर हुसेन हिंसाचाराचा मुख्य सुत्रधार

दिल्ली हिंसाचार प्रकरणात गुन्हे शाखेने करकरडूमा न्यायलयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात आम आदमी पक्षाचे (आप) माजी नेते आणि नगरसेवक ताहिर हुसेनला मुख्य सूत्रधार ठरवलं आहे. आरोपपत्रात नगरसेवक ताहिर हुसेनसह १५ जणांवर आरोप केले गेले आहेत.

सुमारे एक हजार पानांच्या या आरोपपत्रात नगरसेवक ताहिर हुसेनचा भाऊ शाह आलम याच्यावरही आरोप केले गेले आहेत. हिंसाचाराच्या वेळी आरोपी ताहिर हुसेन त्याच्या छतावर होता असं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलं आहे. ताहिर हुसेनवर हिंसाचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताहिरने हिंसाचारासाठी १ कोटी ३० लाख रुपये खर्च केले होते. दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे की, हिंसाचारापूर्वी आरोपी ताहिर हुसेनने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधातील आंदोलनात सहभागी असलेल्या लोकांशी चर्चा केली होती. ताहिरने जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिदशी चर्चा केली होती.


हेही वाचा – पंतप्रधान स्वनिधी योजना : छोट्या विक्रेत्यांना मिळणार १० हजाराचं कर्ज


आरोपपत्रानुसार दिल्ली हिंसाचाराची संपूर्ण तयारी अगोदरच करण्यात आली होती. ताहिर हुसेन लोकांशी बोलले आणि त्याच वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत येतील तेव्हा दिल्लीत हिंसाचार केला जाईल हेही त्याच वेळी ठरवलं गेलं. मात्र पोलिसांनी या आरोपपत्रात उमर खालिदला आरोपी बनवलं नाही आहे.

कोण आहे ताहिर हुसेन?

हाजी ताहिर हुसेन हे मुस्तफाबाद विधानसभेच्या नेहरू विहार प्रभागातील नगरसेवक आहेत. दिल्ली हिंसाचारात ताहिर हुसेनचे नाव आल्यानंतर आम आदमी पक्षाने हुसेनला पक्षातून काढून टाकलं. त्याच्यावर दिल्लीत हिंसाचार पसरवल्याचा आरोप आहे, त्यात इंटेलिजेंस ब्युरो कर्मचारी (आयबी) कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येचा समावेश आहे. त्याच्या घराच्या छतावरून हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

 

First Published on: June 2, 2020 3:01 PM
Exit mobile version