Corona Vaccine: चीनी कंपनीनं मिळवलं कोरोना वॅक्सीनचं पहिलं पेटेंट

Corona Vaccine: चीनी कंपनीनं मिळवलं कोरोना वॅक्सीनचं पहिलं पेटेंट

चीनने कॅनसिनो कंपनीच्या कोरोना विषाणू वॅक्सीनच्या पेटंटला मान्यता दिली आहे. कॅनसिनो बायोलॉजिक्स इंक (CanSino Biologics Inc) कोरोना विषाणूच्या वॅक्सीनचे पेटंट मिळवणारी पहिली चीन कंपनी ठरली आहे. रॉयटर्स या स्थानिक माध्यमाच्या माहितीनुसार, कॅनसिनो कंपनीने Ad5-nCOV नावाची कोरोना विषाणू वॅक्सीन विकसित केली आहे.

तसेच पीपल्ड डेलीच्या अहवालानुसार, चीनच्या नॅशनल इंटलेक्चुअल प्रॉपर्टी अॅडमिनिस्ट्रेशनने ११ ऑगस्टाला कॅनसिनो बायोलॉजिक्स इंक कंपनीच्या वॅक्सीनच्या पेटंटला मंजूरी दिली. यापूर्वी सौदी अरेबियाने म्हटले होते की, ‘कॅनसिनो कंपनी कोरोना विषाणूच्या वॅक्सीनची तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू करणार आहे.’ कॅनसिनोने रशिया, ब्राझिल, चिली येथे तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरू करण्याविषयी बोलले जात होते.

पण कॅनसिनो कंपीनच्या वॅक्सीनची बातमी समोर आल्यानंतर सोमवारी हाँगकाँगमध्ये या कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १४ टक्क्यांची वाढ झाली. तर शांघायामध्ये कंपनीच्या शेअरमध्ये ६.६ टक्क्यांनी वाढ झाली.

कॅनसिनो कंपनीची वॅक्सीन कँडिडेट कॉम कोल्ड व्हायरसमध्ये बदल करून तयार केली आहे. याच पद्धतीने ऑक्सफोर्ड विद्यापीठाची वॅक्सीन देखील तयार करण्यात आली आहे. सुरुवातीला चाचणी दरम्यान या वॅक्सीनचे कोणतेही साईड इफेक्ट दिसून आले नाही आणि वॅक्सीन अँटीबॉडी, टी सेल (पेशी) तयार करण्यास सक्षम होती.

दरम्यान चीनमधील कोरोनाबाधितांची संख्या ८४ हजार ८४९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ हजार ६३४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ७६ हजार ६०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.


हेही वाचा – Corona: कोरोनाची लागण झाल्यावर सर्वात पहिल्यांदा दिसतील ‘ही’ लक्षणे!


 

First Published on: August 17, 2020 3:45 PM
Exit mobile version