घरताज्या घडामोडीCorona: कोरोनाची लागण झाल्यावर सर्वात पहिल्यांदा दिसतील 'ही' लक्षणे!

Corona: कोरोनाची लागण झाल्यावर सर्वात पहिल्यांदा दिसतील ‘ही’ लक्षणे!

Subscribe

अमेरिकन संशोधनकांनी कोरोना विषाणूच्या लक्षणांचा क्रम ओळखला.

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशात कोरोनावरील लस आणि औषधाचे संशोधन सुरू आहे. यादरम्यान अनेक कोरोना संदर्भात खुलासे होत आहेत. दरम्यान आता अमेरिकन संशोधकांना कोरोना विषाणू संदर्भात मोठे यश मिळाले आहे. अमेरिकेतील संशोधकांनी कोरोना विषाणूच्या लक्षणांचे क्रम ओळखले आहेत. ज्याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीला कोरोना आहे की नाही हे ठरविणे सोपे होईल. अमेरिकन संशोधकांना जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवलेल्या लक्षणांचा क्रम तयार केला आहे.

संशोधकांनी कोरोनाच्या लक्षणांच्या क्रमाबद्दल दिलेली माहिती पुढीलप्रमाणे आहेत. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला असले तर त्याला पहिल्यांदा ताप येईल. त्यानंतर खोकला, स्नायू वेदना आणि नंतर मळमळ, उलट्या आणि अतिसार ही लक्षणे दिसू येतील.

- Advertisement -

कोरोना विषाणूची लक्षणांचा क्रम जाणून घेण्याचा फायदा होऊ शकतो. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला लवकर रुग्णालयात दाखल करता येईल. अमेरिकन संशोधकांचा नवा शोध फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार कोरोना विषाणूच्या लक्षणांचा क्रम समजल्यामुळे डॉक्टर रुग्णाच्या उपचारांची सहज योजना आखू शकतात.

डॉक्टर्सने सांगितले आहे की, हा क्रम समजल्यामुळे वेळेवर रोगावर नियंत्रण मिळवता येते. अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संशोधकाचे लेखक पीटी कुन यांनी सांगितले की, ‘या क्रमाच्या मदतीने आपण कोरोना सारख्या आजारावर कधी मात करणार आहोत हे जाणणे सोपे होईल.’

- Advertisement -

याव्यतिरिक्त संशोधनाचे दुसरे लेखक जोसेफ लार्सन यांनी सांगितले की, ‘क्रम ओळखल्यामुळे रुग्णाच्या उपचारांवर योग्य दृष्टीकोन मिळतो आणि उपचारांमध्ये अडचणी उद्भवत नाहीत. ताप आणि खोकला अनेकदा वेगळ्या आजारांशी ही जोडले असतात. ज्यामध्ये मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम आणि सार्सशी संबंधित असतो.’


हेही वाचा – कोरोनाचा असाही फटका; पगार झाला कमी आणि टॅक्स वाढला मोठा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -