चीनमध्ये डेल्टाचा कहर! चीनचे हे शहर संपूर्ण सील; थिएटर-जिमसह सार्वजनिक ठिकाणं बंद

चीनमध्ये डेल्टाचा कहर! चीनचे हे शहर संपूर्ण सील; थिएटर-जिमसह सार्वजनिक ठिकाणं बंद

Delta Variant:

जगभरात कोरोनाचा कहर सुरू असून अद्याप कोरोना रूग्ण आढळून येत आहे. मात्र या जीवघेण्या कोरोनाचं उगमस्थान चीनमधील वुहान हे शहर मानले जात आहे. चीनसह कित्येक देशात कोरोनाचा कहर सुरू होता. त्यानंतर चीनमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला होता. मात्र चीनमध्ये आता डेल्टा व्हेरिएंटचा कहर सुरू असल्याचे समोर आले आहे. चीनच्या आग्नेय प्रांतातील फुजियान शहरात सिनेमा, जिम आणि महामार्ग पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. येथील रहिवाशांना शहर सोडू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर कोरोना संसर्गने पुन्हा डोकं वर काढल्याने चीनच्या या शहरात हा निर्णय घेण्यात आला आहे.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी फुजियानच्या पुतियन शहरात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून याठिकाणी आणखी कोरोनाची रूग्ण आढळण्याची शक्यता आहे. पुतियान शहराची लोकसंख्या ३.२ मिलियन आहे. येथे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने तज्ज्ञांचे पथक पाठवले आहे. येथील काही शाळांमध्ये ऑफलाईन अभ्यास देखील बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या मते, १० ते १२ सप्टेंबर दरम्यान फुजियामध्ये कोरोनाचे ४३ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्यापैकी ३५ पुतियन येथील आहेत. याशिवाय, १० सप्टेंबरपासून पुतियनमध्ये ३२ लक्षणे नसलेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार,१२ सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये एकूण ९५ हजार २४८ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ४ हजार ६३६ लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा उद्रेक चीनमधील जियांगसू येथे शेवटचा दिसला होता जो अलीकडेच दोन आठवड्यांपूर्वी संपला. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी असे सांगितले की, पुतियनमध्ये नोंदवलेल्या बाधितांच्या तपासात असे आढळून आले आहे की हे लोक वेगाने पसरत असलेल्या डेल्टा प्रकाराच्या विळख्यात सापडले आहेत


कोरोना रुग्णांच्या आत्महत्या कोरोनाचे मृत्यू म्हणून मोजा, SCचे केंद्राला निर्देश

First Published on: September 14, 2021 5:29 PM
Exit mobile version