चीनने बनवले हायपरसॉनिक इंजिन, दिल्ली-मुंबईत अंतर केवळ 6 मिनिटांत पार

चीनने बनवले हायपरसॉनिक इंजिन, दिल्ली-मुंबईत अंतर केवळ 6 मिनिटांत पार

हायपरसोनिक इंजिनच्या विकासावर चीन सतत काम करत आहे. चीनने आता अशा इंजिनची चाचणी केली आहे ज्याचा वेग ताशी 11,113 किलोमीटर आहे. हा वेग इतका आहे की तुम्ही दिल्लीहून मुंबईला अवघ्या 6 मिनिटांत पोहोचू शकता आणि दिल्ली ते मुंबई एका तासात 5 फेऱ्या करू शकता. चीनने चाचणी केलेल्या या हायपरसोनिक इंजिनची सर्वात खास बाब म्हणजे त्याचा आवाजसुद्धा कमी आहे. हे चीन हायपरसॉनिक इंजिन हायड्रोजन इंधनावर चालत नाही तर विमानाच्या रॉकेलवर चालते. यामुळेच त्याचा आवाज खूप कमी होतो आणि त्यामुळे त्याचा वेग वाढण्यास मदत होते.

 

असे हायपरसॉनिक इंजिन आजतागायत जगात तयार झाले नव्हते. चीनने बनवलेल्या या इंजिनचे नाव केरोसीनवर आधारित डिटोनेशन इंजिन आहे. याशिवाय सध्या उपलब्ध तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एवढ्या वेगाने कोणतेही लढाऊ विमान उडवले तर त्याचा स्फोट झाला असता.

 

आता प्रश्न पडतो की हे इंजिन एवढा वेग कसा मिळवतो, तर उत्तर असे आहे की ते विमानाला वेगाने धक्का देण्यासाठी शॉकवेव्हची साखळी तयार करते. इंधनाच्या वेगवान प्रवाहामुळे ही साखळी तयार होते आणि ती विमानाला पुढे ढकलते. ही प्रक्रिया झपाट्याने होत राहते आणि वेग वाढतच जातो.

या चीनी हायपरसॉनिक इंजिनला अमेरिकन स्क्रॅमजेट इंजिनचे गुरु देखील म्हटले जाते. अमेरिका सध्या स्क्रॅमजेट इंजिन तयार करण्यात व्यस्तआहे, ज्याचा वेग खूप जास्त असू शकतो, पण तरीही तो चीनच्या या हायपरसॉनिक वेगापेक्षा कमी असेल.

चीन हे इंजिन कुठे वापरणार आहे हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. मात्र, रॉकेलवर चालणाऱ्या या इंजिनची गणना लढाऊ विमानात करणे योग्य ठरणार नाही. आता त्याचा वापर रॉकेट किंवा क्षेपणास्त्र प्रणालीसाठी की अन्य प्रकल्पासाठी त्याचा निर्णय चीन घेणार आहे.

चीनने या हायपरसॉनिक इंजिनची चाचणी जगातील सर्वात मोठ्या शॉक बोगद्यात केली आहे. या चाचणीदरम्यान, इंजिनचा कमाल वेग 11,113 किमी प्रतितास नोंदवला गेला.


हे ही वाचा – गुजरातमध्ये आम्हीच जिंकू; केजरीवालांची कागदावर लिहून भविष्यवाणी

First Published on: November 28, 2022 7:52 PM
Exit mobile version