घरराजकारणगुजरात निवडणूकगुजरातमध्ये आम्हीच जिंकू; केजरीवालांची कागदावर लिहून भविष्यवाणी

गुजरातमध्ये आम्हीच जिंकू; केजरीवालांची कागदावर लिहून भविष्यवाणी

Subscribe

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार भाषणबाजीसोबतच आरोप-प्रत्यारोपांचा खेळही रंगला आहे. प्रत्येक पक्ष गुजरातमध्ये आम्हीच निवडणूक जिंकरणार, असा दावा करत आहे.

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार भाषणबाजीसोबतच आरोप-प्रत्यारोपांचा खेळही रंगला आहे. प्रत्येक पक्ष गुजरातमध्ये आम्हीच निवडणूक जिंकरणार, असा दावा करत आहे. त्यातच आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पत्रकार परिषदेत चक्क कागदावर लिहून देत भविष्यवाणी केली आहे.

केजरीवाल म्हणाले की, अनेक लोक म्हणतात की, राजकारणात माझी भविष्यवाणी खरी ठरते. २०१४ मध्ये दिल्लीत निवडणुका झाल्या तेव्हा मी एका पत्रकाराला लिहून दिले होते की, काँग्रेसला शून्य जागा मिळतील. कुणीही विश्वास ठेवला नाही, पण त्या निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या. पंजाबच्या निवडणुकीत मी खूप सारी भाकितं केली होती. मी म्हटलं होतं नवज्योतसिंग सिद्धू हरतील. चन्नी दोन्ही जागांवर हरतील. बादल यांचे पूर्ण कुटुंब हरणार आणि माझी भविष्यवाणी खरी ठरली.

- Advertisement -

त्याचप्रमाणे आज मी लिहून देत भविष्यवाणी करतो की, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार बनेल, हे तुम्ही लिहून ठेवा किंवा रेकॉर्ड करून ठेवा. २७ वर्षांच्या कुशासनानंतर आता गुजरातच्या जनतेची यांच्या तावडीतून सुटका होईल, असे केजरीवाल म्हणाले आहेत.

केजरीवालांनी मुस्लिमांना बदनाम केले – ओवेसी

- Advertisement -

जेव्हा देशात कोविड आला, तेव्हा सर्वात आधी मुस्लिमांना बदनाम करण्यात आले. तबलिगी जमातीला लक्ष्य करण्यात आले. जहांगीरपुरीमध्ये गोंधळ झाल्यानंतर तिथे बुलडोजर चालवण्यात आला, अरविंद केजरीवाल हे खोटारडे आहेत. त्यांनी मुस्लिमांना देशभरात बदनाम केले, असा आरोप एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -