जम्मू-काश्मीरमध्ये जी २० देशांची बैठक घेण्यास चीनचा विरोध

जम्मू-काश्मीरमध्ये जी २० देशांची बैठक घेण्यास चीनचा विरोध

पुढील वर्षी जी 20 देशांशी जम्मू काश्मीरमध्ये बैठक घेण्याच भारताचा मनोद्य आहे. मात्र, चीनने जोरदार विरोध केला आहे. निकटचा सहयोगी पाकिस्तानच्या स्वरात मिळवत चीनने केले की संबंधित बाजूंनी या समस्येचे राजकारण टाळले पाहिजे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, काश्मीरबाबत चीनचे धोरण स्पष्ट आहे. हा मद्दा भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्वीपासूनच आहे. संयुक्त राष्ट्राच्या संबंधित प्रस्तावर आणि द्विपक्षीय सहमतीनुसार योग्य तोडहा याबाबत निघणे आवश्यक आहे.

जी-20चे सदस्य म्हणून चीन बैठकीत सहभागी होईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना लिजियान यांनी सांगितले की, बैठकीत सहभाग घ्यावा किंवा नाही, याबाबत विचार करण्यात येणार आहे. जी20 ची जम्मू काश्मीरमध्ये बैठक घेण्याच्या प्रस्तावाला पाकिस्तानने २५ जून रोजी विरोध केला होता.

जी-20 देश म्हणजे काय –

जी-20 हा जगातील 20 प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे या गटात 19 देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-20 मध्ये प्रतिनिधित्व करतात.

First Published on: July 1, 2022 9:56 AM
Exit mobile version