चीनच्या उलट्या बोंबा: ‘आमचे टेस्टिंग किट उत्तमच, भारताला वापरायचं ज्ञान नाही’

चीनच्या उलट्या बोंबा: ‘आमचे टेस्टिंग किट उत्तमच, भारताला वापरायचं ज्ञान नाही’

चीनकडून आयात करण्यात आलेल्या पीपीई आणि ‘रॅपिड टेस्टिंग किट’ निकृष्ट दर्जाचे असल्याचं निदर्शनास आल्यावर भारताने या किट्स परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता चीनने यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचे टेस्टिंग किट उत्तम आहेत, असं चीनने म्हटलं आहे. चीनच्या गुआंगजौ वोन्डफो बायोटेक आणि झुवाई लिवजोन डायग्नोस्टिक्स इंक या देन कंपन्यांनी या रॅपिड टेस्टिंग किटचा पुरवठा केला होता. या दोन्ही कंपन्यांनी भारताचा दावा फेटाळून लावला आहे. आम्ही किटची गुणवत्ता तपासानूच निर्यात करतो. टेस्टिंग किटच्या गुणवत्तेला आम्ही प्राधान्य देतो, असं या कंपन्यांनी म्हटलं आहे.

आमच्या रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग किट या उच्च गुणवत्तेच्या असून किटमध्ये कोणतेही दोष नाहीत. उलट ते भारतीय आरोग्य कर्मचाऱ्यांना वापरता येत नसल्याचा आरोप चीनने केला आहे. जगभरात आमचे किट्स वापरले जात आहेत. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आलेल्या नाहीत. भारताने त्यांच्या कर्मचाऱ्यांना युजर मॅन्युअलनुसार प्रक्रिया करण्यास सांगावं, असं या कंपन्यांनी म्हटलं आहे. जगातील ७० देशांना या किटचा पुरवठा केला असून जवळपास १८ कोटी किट निर्यात केले, असं या कंपन्यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा – संकटात कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता रद्द करणे योग्य नाही – मनमोहन सिंग


चीनकडून आलेली रॅपिड टेस्टिंग किट परत चीनला परत केली जाणार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. भारताचे तज्ज्ञ डॉक्टर मुबाशीर अली यांनी चीनवर आरोप केला आहे. चीनी कंपन्यांनी घाईघाईमध्ये ही किट बनवली आहेत. ही किट जगभरात पाठविण्याआधी त्यांची चाचणी घेतलेली नाही. जगभरातून मागणी वाढल्याने त्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने चीनच्या कंपन्यांनी हे कृत्य केलं आहे, असं मुबाशीर अली म्हणाले.

 

First Published on: April 25, 2020 2:26 PM
Exit mobile version