घरअर्थजगतसंकटात कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता रद्द करणे योग्य नाही - मनमोहन सिंग

संकटात कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता रद्द करणे योग्य नाही – मनमोहन सिंग

Subscribe

कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता रद्द करण्याचा निर्णयावर काँग्रेस आक्रमक

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता न वाढवण्याच्या सरकारच्या या निर्णयावर टीका केली असून, यावेळी केंद्रीय कर्मचारी आणि सैनिकांना त्रास देणे योग्य नाही, असं म्हटलं आहे. कॉंग्रेसला या वेळी सरकारी कर्मचारी आणि सैनिकांसमवेत उभं रहावं लागेल, असं मनमोहन सिंग म्हणाले. मनमोहन सिंग नुकत्याच स्थापन झालेल्या कॉंग्रेस सल्लागार गटाचे अध्यक्ष आहेत. या गटाची बैठक एका दिवसाच्या अंतराने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते. या बैठकित त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

मनमोहन सिंग म्हणाले, “ज्यांचा भत्ता कापला आहे अशा लोकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मला असं वाटतं की संकटाच्यावेळी सरकारी कर्मचारी आणि सैन्य दलातील लोकांना त्रास देण्याची गरज नव्हती.”

- Advertisement -

वायनाडचे कॉंग्रेसचे खासदार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, “मला या गोष्टीचं अप्रुप वाटतं की कोट्यवधी बुलेट ट्रेन प्रकल्प आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर पैसे खर्च केले जात आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प आणि सेंट्रल व्हिस्टा सुशोभिकरण प्रकल्प थांबविण्याऐवजी केंद्रीय कर्मचाऱ्यांची, निवृत्तीवेतनधारक आणि देशातील सैनिकांचा महागाई भत्ता (डीए) कापला जात आहे. हा सरकारचा असंवेदनशील आणि अमानुष निर्णय आहे. आपण मध्यमवर्गाकडून पैसे घेत आहात परंतु आपण ते गरीबांना देत नाही आणि आपण ते सेंट्रल व्हिस्टावर खर्च करीत आहात.”


हेही वाचा – Coronavirus: पावसाळ्यात भारताला कोरोनाचा फटका बसू शकतो

- Advertisement -

माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही कर्मचार्‍यांना दिले जाणारे भत्ते कमी करण्याऐवजी केंद्रीय व्हिस्टा प्रकल्प व अन्य अनावश्यक खर्च सरकारने थांबवावेत, असं म्हटलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -