‘चीन’ च्या पैशांवर तालिबानची मदार, म्हणताहेत चीन जगभरातील बाजारातलं ‘एन्ट्री कार्ड’

अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर तालिबान आता सत्तास्थापनेची तयारी करत आहे. पण आर्थिक डबघाईला आलेल्या अफगणिस्तानमध्ये सरकार चालवण्यासाठी तालिबानकडे पैसेच नाहीत. याचाच गैरफायदा घेत चीनने तालिबानशी जवळीक केली असून चीनच्या मदतीने अफगाणिस्तानमधल आर्थिक संकटाच निराकरण करू असं नुकतच तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहीद यांनी म्हटलं आहे.

इटलीतील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे विधान केल्याने तालिबानच्या मागे पाकिस्तानबरोबर चीनही ठामपणे उभं असल्याचं अधोरेखित झाले आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी अफगाणिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवली आहे. यामुळे चीनने तालिबानशी जवळीक केली आहे. अफगाणिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यासही चीनने उत्सुकता दाखवली असून येत्या काही काळात चीन अफगाणिस्तानमधला मुख्य गुंतवणूकदार होईल असे जबीउल्लाह यानेही स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानमध्ये तांब्याच्या खाणी आहेत. त्यांच्या आधुनिकीकरणासाठी चीनने तालिबानला स्वारस्य दाखवले आहे. यामुळे जगातील मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी चीन हा आमचा एन्ट्री पास असल्याचंही जबीउल्लाहने म्हटले आहे. दरम्यान, तालिबानशी जवळीक करुन भारतावर वचक दाखवण्याच्याही प्रयत्नात चीन आणि पाकिस्तान असल्याचे तज्त्रांचे म्हणणे आहे.

First Published on: September 5, 2021 3:54 PM
Exit mobile version