लडाखमध्ये चीनची खुसखोरी, चीनी सैनिक ताब्यात

लडाखमध्ये चीनची खुसखोरी, चीनी सैनिक ताब्यात

लडाखमध्ये चीनची खुसखोरी, चीनी सैनिक ताब्यात

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव आहे. गेल्यावर्षी या तणावात आणखी भर पडली आहे. अशातच आता पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल या भागात शनिवारी भारतीय लष्कराने एका चीनी सैनिकाला ताब्यात घेतले आहे. हा चीनी सैनिक पीपल्स लिबरेशन आर्मीचा सैनिक असल्याचे समोर आले आहे. हा सैनिक चुकून भारतीय हद्दीत आला आहे, असे सांगण्यात येत आहे. भारतीय सैनिक आज किंवा उद्या त्या चीनी सैनिकाला त्याच्या हद्दीत सोडले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे चीनी सैनिक भारतीय हद्दीत आले होते. त्यांनाही भारतीय सैनिकांनी पकडले होते. काही दिवसांच्या प्रक्रियेनंतर भारतीय सैनिकांनी त्या चीनी सैनिकांना चीनकडे सोपवण्यात आले होते. पुन्हा एकदा अशाच प्रकारे चीनी सैनिक भारतीय हद्दीत चुकून आल्याचा प्रकार समोर आला आहे. चीनी सैनिकाची चौकशी करण्यात आली यात त्याने मी रस्ता भरकटलो असल्याचे सांगितले. या चीनी सैनिकाला पुन्हा चीनकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ जानेवारी रोजी लडाखत्या LACच्या भारतीय सीमाभागात एक चीनी सैनिक पकडला गेला. पैंगोग झीलच्या दक्षिणी खोऱ्यातून या चीनी सैनिकाला पकडण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली त्यानुसार हा सैनिक रस्ता भरकटल्याने भारतीय सीमाभागात आला, असे सांगितले जात आहे. भारत आणि चीनमध्ये सीमावाद्याच्या तणावामुळे गेली अनेक वर्ष तणाव आहे. हा सीमावाद कशी संपेल हे सांगता येत नाही. गेल्या वर्षापासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये मोठ्या पातळीवर तणावाचे वातावरण आहे. परंतु भारतीय लष्कराने प्रत्येक वेळी चिनी सैन्याला तोडीस तोड आणि जैसे थे उत्तर दिले आहे.


हेही वाचा –  मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड Zakiur Rehman Lakhvi ला १५ वर्षांची शिक्षा!

First Published on: January 9, 2021 4:07 PM
Exit mobile version