मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, चिनी कंपन्यांचे कोट्यवधी रुपये गोठवले

मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, चिनी कंपन्यांचे कोट्यवधी रुपये गोठवले

नवी दिल्ली – अंमलबजावणी संचलानलयकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. याआधी ईडीने Paytm, Easebuzz, Razorpay आणि Cashfree ची बँक खाती आणि वर्च्युअल अकाऊंट्समधील ४६.६७ कोटी रुपये गोठवले होते. एचपीझेड लोन अॅपच्या माध्यमातून कॉमन नेटवर्क टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिडेट, मोबिक्रेड टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिडेट, मॅजिक डेटा टेक्नॉलॉजी प्रायवेट लिमिटेड, लार्टिंग प्रायवेट लिमिटेड, मॅजिक बर्ड टेक्नॉलॉदी प्रायवेट लिमिटेड, एसपर्ल सर्विसेस प्रायवेट लिमिटेडसारख्या चिनी कंपन्यांमध्ये ग्राहकांचे पैसे जात होते. त्यामुळे ईडीने कारवाई करत या कंपन्यांच्या बँकेतून ९ कोटींहून अधिक पैसे गोठवले आहेत.

हेही वाचा – २००८ ची पुनरावृत्ती होणार? भारतावर मंदीची टांगती तलवार, काय आहे कारण?

नागालॅण्ड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. एचपीझेड टोकन हा एक अॅप आहे. यातून ग्राहकांना बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन करून जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवलं जातं. गुंतवणूकदार जेवढी गुंतवणूक करणार त्यापेक्षा दुप्पट परतावा देण्याचं आमिष सुरुवातीला दाखवण्यात आलं होतं. गुंतवणूकदारांकडून युपीआय आणि इतर माध्यमांतून पैसे घेतले होते. सुरुवातीला काही गुंतणुकीचा परतावाही दिला होता. मात्र, उरलेल्या रक्कमेचा परतावा गेटवे आणि बँकांच्या माध्यमातून विविध व्यक्ती आणि कंपन्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

ईडीने १४ सप्टेंबर रोजी दिल्ली, गाजियाबाद, लखनऊ, मुंबई, बिहार या ठिकाणी छापे टाकले होते. तसंच, आता एचपीझेड लोन अॅपविरोधात झालेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, जोधपूर आणि बंगळुरू येथे पेमेंट कंपनी PayTM, Easebuzz, Razorpay आणि Cashfree च्या १६ ठिकाणी छापे मारले.

हेही वाचा – व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांनो लक्ष द्या, नोव्हेंबरपर्यंत नेटवर्क बंद होण्याची शक्यता

ईडीने केलेल्या तपासात ग्राहकांचे पैसे चुकीच्या अॅड्रेसने दुसऱ्याच खात्यावर जमा होत असल्याचं सिद्ध झालं. चिनी लोकांच्या संस्थांच्या मर्चंट आयडी आणि बँकेत १७ कोटींची रक्कम जमा केली होती. हा सर्व प्रकार बनावट अॅड्रेसच्या आधारवर काम करत असल्याचंही सिद्ध झालं.

हेही वाचा – RBIचा मोठा निर्णय; ‘या’ करणार उपाययोजना

First Published on: September 29, 2022 3:45 PM
Exit mobile version