२००८ ची पुनरावृत्ती होणार? भारतावर मंदीची टांगती तलवार, काय आहे कारण?

खरेतर डॉलरसमोर रुपयाची दिवसेंदिवस किंमत घसरत असल्याने आरबीआय सातत्याने डॉलरची विक्री करत आहे. मात्र, आरबीयच्या या प्रयत्नांनाही यश येत नाही.

forex reserves

नवी दिल्ली – भारतात २००८ साली मंदीची लाट पसरली होती. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. व्यवसाय ठप्प झाला. आता पुन्हा अशीच परिस्थिती भारतात येण्याची शक्यता आहे. कारण, भारताचा परकीय चलन साठा (Forex Reserves) डिसेंबरपर्यंत २ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. रॉयटर्सच्या अहवालात ही शक्यता प्रसिद्ध करण्यात आलीय. खरेतर डॉलरसमोर रुपयाची दिवसेंदिवस किंमत घसरत असल्याने आरबीआय सातत्याने डॉलरची विक्री करत आहे. मात्र, आरबीयच्या या प्रयत्नांनाही यश येत नाही.

हेही वाचा व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांनो लक्ष द्या, नोव्हेंबरपर्यंत नेटवर्क बंद होण्याची शक्यता

RBI कडे एक वर्षापूर्वी 642 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा होता, जो आता 100 अब्ज डॉलरने कमी होऊन 545 अब्ज डॉलर झाला आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार, डिसेंबरमध्ये ते 523 अब्ज डॉलरपर्यंत घसरू शकते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांचा असा विश्वास आहे की राखीव 500-540 अब्ज डॉलर दरम्यान असू शकते. 26-27 सप्टेंबर रोजी हे सर्वेक्षण घेण्यात आले आणि त्यात 16 अर्थतज्ज्ञांनी भाग घेतला होता.

हेही वाचा आता LPG ग्राहकांना वर्षाला मिळणार 15 सिलिंडर, जाणून घ्या…

जर, रॉयटर्सने केलेला दावा खरा ठरला तर २००८ पेक्षाही वाईट मंदी भारतात येऊ शकते, असंही अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यावेळीही परकीय चलन साठ्यात सुमारे 20 टक्के घट झाली होती. आताचे अंदाज देखील असे सूचित करतात की परकीय चलन 20 टक्के खाली जाईल. तसंच, भारत 2012 च्या टॅपर-टॅट्रम कालावधीच्या तुलनेत आपला परकीय चलन साठा खूप वेगाने खर्च करत आहे.

हेही वाचा – RBIचा मोठा निर्णय; ‘या’ करणार उपाययोजना

आरबीआय अपयशी

घसरलेला रुपया वाचवण्यासाठी मध्यवर्ती बँकेने डॉलरची विक्री करूनही भारतीय चलनात फारसा उपयोग झाला नाही. बुधवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ८१.९५ या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता. आज तो 40 पैशांनी घसरून 81.93 च्या पातळीवर बंद झाला आहे. गेल्या वर्षभरात डॉलरच्या तुलनेत रुपया 10 टक्क्यांनी घसरला आहे.

एचडीएफसीचे प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट साक्षी गुप्ता सांगतात की, रुपयाची सध्याची स्थिती पाहता आरबीआय यापुढेही हस्तक्षेप करत राहील असे दिसते. ते म्हणाले की, रुपया वाचवण्यासाठी आणि चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे परकीय चलन साठ्यात आणखी घट होईल.