बॉईज लॉकर रुम प्रकरण : बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बॉईज लॉकर रुम प्रकरण : बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बॉईज लॉकर रुम प्रकरण : बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील गुरुग्राम येथे घडली आहे. गुरुग्रामच्या पॉश परिसरातील डीएलएफ कार्ल्टन इस्टेट (डीएलएफ फेज -५) च्या अकराव्या मजल्यावरुन विद्यार्थ्यानी आत्महत्या केल्याचे उघडकीस आहे आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजता घडली असून या घटनेनेमुळे बॉईज लॉकर रुम प्रकरण समोर आले आहे. याबाबत दिल्लीचे सायबर पोलीस ब्रँच अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याने याबाबत कोणालाही दोषी ठरवलेले नाही. तसेच त्यांनी सुसाइट नोट देखील लिहून ठेवली नाही. तसेच आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक शोध घेत आहेत. दरम्यान, याप्रकरणी १७४ अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

बॉईज लॉकर रुम प्रकरण

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, बॉयज लॉकर रुममध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यामध्ये दिल्लीच्या विद्यार्थ्यांसह एनसीआरच्या विद्यार्थ्यांचा आणि नोएडाच्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये विद्यार्थी एकमेकांना ओळखत देखील नव्हते. हे सर्व विद्यार्थी या ग्रुपमध्ये एकत्र आले आणि त्यानंतर त्यांचा ग्रुप तयार झाला आहे.

अल्पवयीन मुलांचाही समावेश

सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ग्रुपमध्ये अल्पवयीन मुलांचा देखील समावेश होता. ज्यांचे वय १८ वर्ष आहे. पोलिसांनी या चारही मुलांकडे चौकशी केली असता त्यातील एक मुलगा नोएडा येथील असल्याचे समोर आले आहे.

काय आहे बॉईज लॉकर रुम?

‘बॉईज लॉकर रुम’ हे इंस्टाग्रामवर तयार केलेल्या एका ग्रुपचे नाव आहे. या ग्रुपमध्ये विद्यार्थी अश्लील चॅट करत असल्याचे समोर आले आहे. या ग्रुपमध्ये मुलींचे फोटो टाकून सामुहिक बलात्काराराविषयी बोले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच या ग्रुपमध्ये दक्षिण दिल्लीच्या विद्यार्थ्यांचा समावेश अधिक प्रमाणात आहे.

इन्स्टाग्रामकडे मागितले उत्तर

पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी इन्स्टाग्राम या सोशल साईटकडे खुलासा मागितला आहे. मात्र, इन्स्टाग्रामकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. तसेच पोलिसांनी खबरदारी म्हणून मुलास थेट कॉलद्वारे बोलविले जात नाही. सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी किंवा शाळेशी संपर्क साधला जात असून त्यानंतर विद्यार्थ्यांशी बोले जात आहे.


हेही वाचा – रेल्वेने १ लाख ८० हजार स्थलांतरित मजुरांना सोडले घरी


 

First Published on: May 8, 2020 11:59 AM
Exit mobile version