घरताज्या घडामोडीरेल्वेने १ लाख ८० हजार स्थलांतरित मजुरांना सोडले घरी

रेल्वेने १ लाख ८० हजार स्थलांतरित मजुरांना सोडले घरी

Subscribe

रेल्वेने १ लाख ९० हजार मजुरांना त्यांच्या घरी सोडले आहे. त्यामुळे मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यापासून अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमधले मजूर मोठ्या संख्येने अडकून पडले होते. त्यांना परत आपल्या गावी, आपल्या घरी पाठवण्यासाठी केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. त्यानुसार ७ मे गुरुवारपर्यंत रेल्वेने १ लाख ९० हजार मजुरांना त्यांच्या घरी सोडले आहे. त्यामुळे मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

४० विशेष गाड्या धावल्या

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ४० विशेष गाड्या धावल्या. यामध्ये १ हजार २०० मजुरांचा समावेश होता. विशेष म्हणजे या ट्रेनमध्ये दिल्ली ते मध्य प्रदेशच्या छतरपुरला जाणाऱ्या पहिल्या ट्रेनचा देखील समावेश होता. तर, बुधवारी ५६ ट्रेन धावल्या होत्या. या विशेष ट्रेनमध्ये २४ डब्यांचा समावेश असून प्रत्येक डब्यात ७२ आसनांची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार एका डब्यात केवळ ५४ जणांना बसण्याची सोय करण्यात आली आहे.

- Advertisement -

खर्चाची माहिती देण्यास रेल्वेचा नकार

या सेवेबाबत रेल्वेकडे विचारणा केली असता रेल्वेने खर्चाची माहिती देण्यास नकार दिला आहे. तसेच एका ट्रेनच्या मागे ८० लाख रुपयाचा खर्च येत असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.

८० हजार प्रवाशांना घरी सोडले

गेल्या पाच दिवसांत गुजरातमध्ये अडकलेल्या विविध राज्यांतील सुमारे ८० हजार मजुरांना ६७ विशेष ट्रेनने घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisement -

२ मे ते ६ मे पर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशा येथील ८० हजार ४०८ मजुरांना ६७ विशेष गाड्यांनी घरी सोडण्यात आले आहे. प्रत्येक ट्रेनमध्ये १ हजार २०० मजुरांचा समावेश होता. तसेच गुरुवारी गुजरात वरुन ३४ ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये १ लाख २० हजार प्रवाशांचा समावेश होता. या सर्व मजुरांना उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड याठिकाणी सोडण्यात आले आहे. – अश्विन कुमार, गुजरातचे मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव


हेही वाचा – विशाखापट्टणम वायू गळती: काय आहे नेमका स्टायरिन गॅस?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -