‘त्या’ वक्तव्यावरुन काँग्रेस हायकमांडकडून गेहलोत यांची कानउघडणी

‘त्या’ वक्तव्यावरुन काँग्रेस हायकमांडकडून गेहलोत यांची कानउघडणी

राजस्थानमधील राजकीय वातारण सध्या चांगलचं तापलेलं आहे. बंडखोरी करणारे राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी टीका केली आहे. यावर चक्क काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने गेहलोत त्यांचे कान टोचले आहेत. पायलट यांच्यावर ‘निक्कमा’, ‘नकारा’, अशा शब्दांत टीका केल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

सचिन पायलट यांच्यावर टीका करताना गेहलोत यांनी  निक्कमा, नकारा असे शब्द वापरले. गेहलोत यांनी वापरलेली भाषा अत्यंत चुकीची होती, असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं सांगितलं. आपल्या माजी उपमुख्यमंत्र्याबद्दल असं बोलणं तुम्हाला शोभत नाही, अशी कान उघडणी वरिष्ठ नेत्याकडून करण्यात आली आहे.


हेही वाचा – राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण


अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांचं नाव न घेता म्हटलं होत की, “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून तो  निक्कमा, नकारा आहे. काही काम करत नाही हे आम्हाला ठाऊक होतं.” याच टीकेवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून  गेहलोत यांचा समाचार घेण्यात आला आहे. दरम्यान, गेहलोत यांच्या या अप्रत्यक्ष टीकेवर सचिन पायलट यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

First Published on: July 21, 2020 3:00 PM
Exit mobile version