घरCORONA UPDATEराष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण

Subscribe

राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. फौजिया खान यांच्या परभणीतील घरासह परिसर सील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत.

दरम्यान, आज सिंदुधुर्गातील आमदार वैभव नाईक कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट झालं. त्यांची काल कोरोना चाचमी करण्यात आली होती. आज अहवाल प्राप्त झआला. तर काल मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. अस्लम शेख यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली होती. संपर्कात आलेल्यांना स्वत:ची चाचणी करण्याचं आवाहन शेख यांनी केलं होतं. लक्षणं नसल्यामुळे घरुन काम करत राहणार असल्याचं अस्लम शेख यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -