कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून अटक

कर्नाटकमधील काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना ईडीकडून अटक

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या अडचणीत वाढ; Money Laundering प्रकरणी न्यायालयाने बजावला समन्स

कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने दिल्लीतून अटक केली आहे. दिल्लीत सलग चौथ्या दिवसाच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेनंतर काँग्रेसमधील दिग्गज नेते डी. के. शिवकुमार यांनाही ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावली होती. गेल्याच वर्षी ईडीने शिवकुमार यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचे प्रकरण दाखल केले होते. मिळालेल्या माहितीनुसार कथित कर चोरी, हवाला यांच्या आधारे डी. के. शिवकुमार यांच्या विरोधात काही प्रकरणं दाखल करण्यात आली आहेत.

काय आहे प्रकरण

यापूर्वी ईडीने नोव्हेंबर २०१८ साली डी. के. शिवकुमार यांना नोटीस बजावली होती. मात्र शिवकुमार यांनी चौकशीसाठी हजर न राहण्याची सुट मागितली होती. परंतु त्यांना ईडीकडून दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर त्यांनी याविरोधात कर्नाटक हायकोर्टात या विरोधात याचिकादेखील दाखल केली होती. मात्र त्यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती. अखेर त्यांना ईडीने अटक केली आहे. यापूर्वीही २०१७ मध्ये डी. के. शिवकुमार यांच्या ६४ ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली होती. दरम्यान, या छाप्यांचा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंध नसल्याचे शिवकुमार यांनी म्हटले होते.

First Published on: September 3, 2019 9:07 PM
Exit mobile version