काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन

काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन

काँग्रेस प्रवक्ते आणि नेते राजीव त्यांगी यांचे आज, बुधवारी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झाले. राजीव त्यागी यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना त्याच परिस्थितीत गाझियाबाद येथील यशोदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळपासून त्यांची प्रकृती चांगली होती. याव्यतिरिक्त संध्याकाळी पाच वाजता त्यांनी एका हिंदी खासगी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर घरी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेतच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

राजीव त्यागी यांच्या निधनानंतर काँग्रेसने शोक व्यक्त केले आहे. राजीव त्यागी यांच्या निधनामुळे आम्हाला दु:ख झालं आहे. ते एक पक्के काँग्रेसी आणि खरे देशभक्त होते. या कठिण काळात आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. तर त्यांच्यासोबत अनेकदा टीव्हीवरील डिबेटमध्ये सहभागी असलेल्या संबित पात्रा यांनीदेखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

हेही वाचा –

लवकरच तैमूर होणार दादा; ट्विटरवर नेटकऱ्यांच्या मिम्सचा धुमाकूळ

First Published on: August 12, 2020 10:27 PM
Exit mobile version