कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला 14 व्या दिवशी कोची येथून सुरुवात

कॉंग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला 14 व्या दिवशी कोची येथून सुरुवात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांसह बुधवारी 14 व्या दिवशी कोची-भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू केली. कोची जिल्ह्यातील मडवाना येथून अनेक नेत्यांसह राहुल गांधी यांनी सकाळी 6.45 वाजता यात्रेला सुरुवात केली. कोचीतून कॉग्रेसचे नेते 13 किमी चालत इडापल्लीपर्यंत पोहोचणार आहेत. या यात्रेत आज यात्रेत सामील झाले असल्याचे पक्षाचे प्रभारी संपर्क सचिव जयराम रमेश यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी या यात्रेाबाबत ट्विट केले आहे. यामध्ये “दिवसाची प्रेरणादायी सुरुवात. भारत जोडी यात्रेच्या कल्पनेची गुरुकिल्ली ज्यांच्या समतेची शिकवण आहे, असे महान आध्यात्मिक नेते, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक, श्री नारायण गुरू यांना श्रद्धांजली”, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे कार्यकर्ते, अनुयायी आणि जनता 18 दिवस दक्षिणेकडील केरळमध्ये राहणार आहेत. ही यात्रा केरळच्या टप्प्यात असून येत्या 11 दिवसांत राज्यातून जाणार आहे.

कन्याकुमारी ते काश्मीर हा 3,500 किमीचा प्रवास 150 दिवसांत पूर्ण होईल आणि त्यात 12 राज्यांचा समावेश असेल. केरळमधून हा प्रवास पुढील 18 दिवस राज्यातून जाणार असून 30 सप्टेंबर रोजी कर्नाटकात पोहोचणार आहे. उत्तरेकडे जाण्यापूर्वी ते 21 दिवस कर्नाटकात असणार आहे. पदयात्रा दररोज 25 किमी अंतर पूर्ण करणार आहे.

7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून काँग्रेसच्या भारत जोडी यात्रेला सुरुवात झाली होती. 3 हजार 570 किमी लांबीची काँग्रेस भारत जोडो यात्रा श्रीनगरमध्ये संपणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढण्यात येत असून ही यात्रा देशातील 12 राज्यांमधून जाणार आहे.

केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की भारत जोडो यात्रेने आतापर्यंत 275 किमी पूर्ण केले आहेत. आजपर्यंत आपला 285 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होईल. ते पुढे म्हणाले की, प्रियांका गांधी लवकरच भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. केरळमध्येच ती या प्रवासाचा एक भाग असेल.


हेही वाचा – दिल्लीत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 6 जणांवरून गेला ट्रक; 4 जणांचा मृत्यू

First Published on: September 21, 2022 9:30 AM
Exit mobile version