घरताज्या घडामोडीदिल्लीत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 6 जणांवरून गेला ट्रक; 4 जणांचा मृत्यू

दिल्लीत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 6 जणांवरून गेला ट्रक; 4 जणांचा मृत्यू

Subscribe

अतिवेगवान ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 6 जणांच्या अंगावरून ट्रक नेल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. देशाची राजधानी दिल्लीतील सीमापुरी भागात मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

अतिवेगवान ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 6 जणांच्या अंगावरून ट्रक नेल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. देशाची राजधानी दिल्लीतील सीमापुरी भागात मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. (4 people killed after a truck rammed 5 people in delhi)

मिळालेल्या माहितीनुसार, एका अनियंत्रित ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 6 जणांवरून ट्रक नेले. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीमापुरीतील डीटीसी डेपो रेडलाइटजवळ ही घटना घडली आहे.

- Advertisement -

मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. मात्र, ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दिल्ली पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून, या अपघातात करीम (52), छोटे खान (25), शाह आलम (38) आणि राहुल (45) यांचा मृत्यू झाला, तर 16 वर्षीय मनीष आणि 30 वर्षीय प्रदीप जखमी झाला आहे. अपघातात सामील असलेल्या ट्रकचा शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली असून योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास राहुल गांधींचा नकार?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -