काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक: अशोक गहलोतांनी माघार घेतल्यानंतर ‘हा’ ज्येष्ठ नेता शर्यतीत

काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक: अशोक गहलोतांनी माघार घेतल्यानंतर ‘हा’ ज्येष्ठ नेता शर्यतीत

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी माघार घेतली आहे. अशोक गहलोत अध्यक्षपदासाठी मुख्य दावेदार होते. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता चुरस आणखी वाढली आहे. त्यातच, माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जून खर्गे निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षातील सुत्रांनुसार मल्लिकार्जून खर्गे अध्यक्षपदासाठी तिसरे उमेदवार ठरू शकणार आहेत. शशी थरूर आणि दिग्विजय सिंह यांनी उमेदवारीची औपचारिक घोषणा आधीच केली आहे. तसंच, ते लवकरच उमेदवारी अर्जही भरणार आहेत.

हेही वाचा काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची घोषणा

मल्लिकार्जून खर्गे काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करतील की नाही याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार, खर्गे काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. तसंच, निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकीत उतरण्याच्या ते विरोधात नसून सोनिया गांधी यांचे निर्देश आल्यावरच ते उमेदवारीचा पुढचा विचार करणार असल्याचंही सांगण्यात येतंय.

माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जून खर्गे यांना नेहरू-गांधी कुटुंबाचा विश्वासू नेता मानले जातात. अशोक गहलोतही नेहरू-गांधी कुटुंबाचे विश्वासू नेता आहेत. त्यामुळे त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याने खर्गे १७ ऑक्टोबरला होण्याऱ्या निवडणुकीच्या शर्यतीत उतरतील असं म्हटलं जातंय.

हेही वाचा – काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुरही निवडणूक लढवणार, अशोक गहलोत यांच्यासोबत टफ फाइट?

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण असणार यावरून पेच निर्माण झाला होता. सोनिया गांधींनंतर पुढचा अध्यक्ष राहुल गांधी असणार असा कयास लावला जात होता. पक्षातील अनेक नेत्यांनी तशीच मागणी केली होती.  २२ सप्टेंबर रोजी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली. त्यानंतर, २४ सप्टेंबरपासून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात. तर, १७ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणरा आहे. त्यानंतर लगेच निकाल लागणार असून १९ ऑक्टोबर रोजी पक्षाला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. २४ वर्षांनंतर गांधी कुटुंबाच्या बाहेरील व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहे. सीताराम केसरी हे अखेरचे बिगर गांधी अध्यक्ष होते.

हेही वाचा  घाबरू नका! डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची स्थिती उत्तम; अर्थमंत्र्यांचा दावा

First Published on: September 30, 2022 8:40 AM
Exit mobile version