लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

सोनिया गांधी आणि राहूल गांधी

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीतून १५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सर्व राजकीय पक्षाआधी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ११ उमेदवार उत्तर प्रदेश आणि उर्वरीत ४ उमेदवार गुजरातचे आहेत. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी ही यादी जाहीर केली आहे.

उत्तरप्रदेशमधून ११ जण निवडणुकीच्या रिंगणात

या यादीनुसार काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून तर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी रायबरेलीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधून इमरान मसूद, बदायूमधून शलील इकबाल, घौरहरामधून जितीन प्रसाद, उन्नावमधून अन्नू टंडन, फरुखाबादमधून सलमान खुर्शीद, अकबरपूरमधून राजाराम पाल, जालौनमधून बृजाल, फैजाबादमधून निर्मल खत्री आणि कुशीनगरमधून आर पी एन सिंह लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

गुजरातमधून ४ जण निवडणुकीच्या रिंगणात

तर गुजरातच्या अहमदाबाद पश्चिममधून राजू परमार, आनंदमधून भरत सिंह सोलंकी, वडोदरामधून प्रशांत पटेल आणि थोटा उदयपूरमधून रंजीत मोहन सिंह रंधवा लोकसभा निवडणुक लढवणार आहेत.

First Published on: March 7, 2019 10:09 PM
Exit mobile version