‘भाषण नहीं माफी मांगो’; काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

‘भाषण नहीं माफी मांगो’; काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

'भाषण नहीं माफी मांगो'; काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावरून आता काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे. ‘भाषण नहीं माफी मांगो’ असा हॅशटॅग वापरत मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. संकटकाळात मोदींनी देशाला वाऱ्यावर सोडून दिलं. कोणतंही भाषण, खोटे अश्रू हे तथ्य बदलणार नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसने ट्विट करत मोदी माफी मागा अशी मागणी केली आहे. काँग्रेसने ट्विटमध्ये देशातील कोरोनाची परिस्थिती, देशातील लसीकरण मोहिमेवरून मोदींवर टीकास्त्र डागलं आहे. “देश सर्वात मोठा लस उत्पादक असूनही, नियोजनासाठी एक वर्ष असतानाही तसेच कोरोनाची पहिली भयंकर लाट येऊनही मोदी सरकारचे लसीकरण धोरण पूर्णपणे अयशस्वी झाले आहे. दुर्दैवाने या सगळ्याची किंमत निष्पाप नागरिकांना चुकवावी लागत आहे.

“लाखो लोकांनी आपले जीव गमावले कोट्यवधींनी आपला रोजगार गमावला. असे सर्व असतांना मोदींनी या सगळ्यापासून लपण्याचा मार्ग निवडला. केवळ मन कि बात च्या माध्यमातूनच ते लोकांसमोर येणे योग्य समजतात”, अशी टीका काँग्रेसने ट्विटद्वारे केली आहे.

 

 

 

First Published on: June 7, 2021 6:11 PM
Exit mobile version