Live Update: मुंबईत गेल्या २४ तासांत १३६ पोलीस आढळले कोरोनाबाधित

Live Update: मुंबईत गेल्या २४ तासांत १३६ पोलीस आढळले कोरोनाबाधित

Live update Mumbai Maharashtra

गेल्या २४ तासांत १३६ मुंबईतील पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाबाधित सक्रीय पोलिसांचा आकडा आता १ हजार २५३वर पोहोचला आहे.


राज्यात गेल्या २४ तासांत ४३ हजार २११ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून १९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.  तसेच आज राज्यात दुसऱ्याबाजूला २३८ नव्या ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली असून एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या १ हजार ६०५वर पोहोचली आहे.


मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर विशेष कोर्ट १८ जानेवारीला निकाल देणार.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसाच्या गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहे. उद्या आणि परवा म्हणजे शनिवार आणि रविवारी केजरीवाल गोव्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.


गेल्या २४ तासांत मुंबईत ११ हजार ३१७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे.


दिल्लीत गेल्या २४ तासांत २४ हजार ३८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६ हजार २३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या दिल्लीत ९२ हजार २७३


अजित पवार यांच्या उपस्थितीत 15 जानेवारीला पुण्यात कोरोना आढावा बैठक


मत मागताना वाकलेली लोकं मत मिळाल्यानंतर ताठ होतात, काही लोकं काम न करता बोलतात, कोरोना काळात कौतुकासाठी नाही तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम केलं, महापालिकेचे कामकाज सोप्पी गोष्ट नाही, कोणी कौतुक करावा म्हणून काम करत नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 


शासकीय परिवहन सेवा, वरळी, विभागात 2 इलेक्ट्रिक गाड्यांचे आज उदघाटन, यासाठी आज दुपारी 12 वाजता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य अधिकारी मनीषा म्हैसकर उपस्थित राहणार आहेत.


एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू


अनिल देशमुखांच्या जामीनावर आज सुनावणी


फोन टॅपिंग प्रकरणात कागदपत्रे आणि पेनड्राईव्ह सोपवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आणखी वेळ मागितला


मकर संक्रांतीच्या दिवशी आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजाचं मंदिर आणि देहूतील संत तुकाराम महाराजांचं मंदिर बंद राहणार आहे.


इराकमधील अमेरिकी राजदूतावासावर रॉकेट हल्ला झाला असून यात चार जण जखमी झाले आहेत.


 

First Published on: January 14, 2022 9:49 PM
Exit mobile version