Live Update : मुंबईत शुक्रवारी ८४६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Live Update : मुंबईत शुक्रवारी ८४६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Live update Mumbai Maharashtra

मुंबईत शुक्रवारी ८४६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातप्रमाणे १ हजार २९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढलेला नाही. तर राज्यात आज १३,८४०नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. तर ८१ जणांचा आज मृत्यू झाला असून २७,८९१ रग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


नितेश राणेंचा १८ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी


नितेश राणेंच्या पोलीस कोठडीवर सुनावणी सुरू


हिंदुस्तानी भाऊला 1 दिवसाची पोलीस कोठडी


नितेश राणेंच्या कोठडीबाबत थोड्याच वेळात कणकवली कोर्टात होणार सुनावणी


हिंदुस्तानी भाऊची कोठडी आज संपणार, वांद्रे कोर्टात करणार हजर


काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी गोव्यात दाखल


मंत्री आदित्य ठाकरे 13 ते 14 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर


बंडातात्या कराडकरांविरोधात रुपाली ठोंबरे-पाटील यांनी न्यायालयात दाखल केला खटला


केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल, नितेश राणेंच्या याचिकेवर आज होणार सुनावणी


योगी आदित्यनाथ यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल


अनिल देशमुखांंच्या दोन्ही मुलांना पीएमएलए कोर्टाकडून समन्स,

वारंवार तक्रार करुनही सलील आणि ऋषिकेश चौकशीसाठी हजर न राहत असल्याचा ईडीचा आरोप


महसुली सरकार पक्षपाती- अमृता फडणवीस


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नीट पीजी 2022 ची परीक्षा 8 आठवड्यांपर्यंत ढकलली पुढे,  12 मार्चला होणारी परीक्षा रद्द


बंडातात्या कराडकरांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आक्रमक


शिवसेना गोवा निवडणुक रंगात आणणार – संजय राऊत


बंडातात्या कराडकरांविरोधात गुन्हा दाखल,


भारतातील कोरोना रुग्णसंख्या 13 टक्क्यांनी घटली, 1,49,394 नव्या रुग्णांची नोंद


बंडातात्या कराडकरांच्या साताऱ्यातील मठाजवळ पोलीस दाखल


लस न घेणाऱ्या नागरिकांना बनावट लसीकरण प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक


आमदार नितेश राणेंची पोलीस कोठडी आज संपणार; जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी


आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द

या जम्बो मेगाब्लॉकमुळे 350 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय 100 हून लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस, मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज गोवा दौऱ्यावर, आज एक दिवशीय दौऱ्यात ते गोव्याची राजधानी पणजीत घरोघरी जाऊन प्रचार, पर्यटन क्षेत्राचा आढावा घेणार, व्हर्च्युअल रॅलीतही सहभागी होणार


 

First Published on: February 4, 2022 8:25 PM
Exit mobile version